सावधान! मोबाईलच्या अतिवापराने होऊ शकते ‘ही’ गंभीर समस्या
आजकाल मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर खूप वाढला आहे. तासन्तास एकाच स्थितीत बसून मोबाईल(phones) वापरल्याने मान वाकण्याची समस्या निर्माण होत आहे. या समस्येमुळे केवळ मानदुखीच नाही, तर आरोग्याच्या इतर गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात.
डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, स्क्रीन डिव्हाइसवर तासन्तास मान खाली घालून पाहिल्याने मान आणि पाठदुखीसह सुन्नपणा, जडपणा, पुढे वाकणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या समस्या वाढत आहेत. वैद्यकीय शास्त्रात याला ‘स्टेथनिंग स्पाइन’, ‘फ्लॅट बँक’ व ‘रिस्टोलिस्थीसिस’ म्हणतात.
गेल्या दोन वर्षांत या समस्यांमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेडिओलॉजिस्टच्या मते, दररोज शहरी भागात 10 पैकी 7 रुग्णांच्या एक्स-रेमध्ये मानेची समस्या दिसून येते. यात बहुतेक रुग्ण 25 ते 50 वर्षे वयोगटातील आहेत.
समस्या आणि कारणे:
समस्या: वाकलेली मान डोक्याच्या दुप्पट वजन हाडांवर टाकते. यामुळे मानेची वक्रता कमी होते. चालताना, उठता-बसताना व्यक्तीला वेदना होतात.
कारणे:
तासन्तास एकाच स्थितीत मोबाईलवर(phones) व्यस्त असणे.
चुकीच्या स्थितीत बसून डिस्प्ले डिव्हाइस वापरणे.
तासन्तास बसून किंवा झोपून, मान वाकवून मोबाइल पाहणे.
उपाय काय?
स्क्रीन टाइम कमी करा: मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा.
योग्य स्थितीत बसा: बसताना किंवा उभे राहताना मान सरळ ठेवा.
नियमित व्यायाम करा: चालणे, मान खाली-वर करणे आणि पाठीचे व्यायाम नियमितपणे करा.
हेही वाचा :
यंदा उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना पुन्हा वेग
विश्वासघात! पत्नीने पतीची किडनी विकली अन् प्रियकरासोबत फरार