राज्यात पुन्हा खळबळ! निवडणुकीच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप

आज महाराष्ट्रात विधानसभेच्या(political news) 288 जागांसाठी मतदान पार पडत आहे. त्यामुळे आज राज्यातील तब्ब्ल 4136 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मात्र आज मतदानाच्या दिवशीच नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे वातावरण चांगलेच तापले आहे. कारण अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात तुफान राडा झाला आहे. मात्र आता या पाठोपाठ साकोऱ्यात मतदारांना पैसे वाटप करणारी गाडी पकडल्याने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातील साकोऱ्यात मतदारांना पैसे वाटप करणारी गाडी आल्याची माहिती अपक्ष उमेदवार डॉ. रोहन बोरसे यांच्या कार्यकर्त्यांना मिळाली. मात्र यावेळी गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हर गाडी सोडून थेट फरार झाला आहे. मात्र यानंतर कार्यकर्त्यांनी हातात नोटा दाखवल्या आहेत.

मात्र एका कार्यकर्त्याने(political news) गाडीच्या टपावर उभं राहत चक्क नोटा फाडल्या आहेत. त्यामुळे आता घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते. मात्र यावेळी ती गाडी कोणाची व पैसे कोणाचे आहे? तसेच याबाबत पोलिसांकडून देखील कसून चौकशी केली जात आहे. मात्र आता हे पैसे नेमके कोणाचे निघणार? हे पाहणे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.

याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस देखील समीर भुजबळांनी अडवली होती. मात्र यानंतर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र यानंतर मोठा राडा झाला होता. मात्र हा संपूर्ण प्रकार नांदगाव-मनमाड रस्त्यावर घडला होता.

हेही वाचा :

ए. आर. रेहमान यांच्या पत्नीला किती मिळणार पोटगी?

शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गट संतापला

तिने प्रेमसंबंधाला नकार दिला अन् तरुणाने ”त्या’ फोटोंचं असं काही केलं की…