राज्यात खळबळ! ‘या’ माजी आमदारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणी पोलिसांनी(police) अटक केली आहे. भानुदास मुरकुटे असे या माजी आमदाराचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, राज्यात कित्येक दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना घडत आहे. अशातच आता राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. 2019 पासून मुंबई, दिल्ली तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीनंतर आता पोलीस(police) देखील अ‍ॅक्शन मोडवर आले.

फिर्यादीनंतर श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर आयपीसी कलम 376,328,418,506 अन्वये राहुरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस मुरकुटे यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

मात्र कामानिमित्त मुरकुटे हे मुंबई येथे गेले होते. ते रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले. त्यानंतर रात्री साडेअकराच्या दरम्यान राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

ऊसाच्या दरावरून राजू शेट्टींचा पुन्हा आक्रमक पवित्रा

राज्यात आचारसंहिता कधी लागणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र हादरला! शाळेच्या टॉयलेटमध्येच बालवाडीत शिकणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार