अजित दादा महायुतीतून बाहेर पडा… प्रकाश आंबेडकरांची मोठी ऑफर
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख राजकीय(political news)पक्ष हालचाली करत असताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठी राजकीय ऑफर दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीसोबत मैत्री करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांना त्यांच्या राजकीय वर्चस्वाची पुनर्स्थापना करण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आगामी विधानसभा (political news)निवडणुकीसाठी आम्ही स्वबळावर लढणार आहोत. अजित पवार गट ते आम्हाला वापरत आहेत, असं म्हणत आहे. वंचितकडे जातो असं सांगत आहेत. आम्हाला थांबवायचं असेल तर सीट वाढवा असं सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावं. त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो.”
मराठा आणि ओबीसी आरक्षणावर सविस्तर भूमिका
प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. “राजकीय पक्षांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संवेदनशील विषयावर बोललं पाहिजे. दंगल होईपर्यंत वाट पाहू नये. परिस्थिती स्फोटक आहे. एवढं सांगतो. तोडगा काढणारे राजकीय पक्ष आहेत आणि विधानसभा आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
प्रकाश आंबेडकर यांनी एनसीपी, काँग्रेस, ठाकरे गट आणि भाजपावर टीका करताना म्हटलं, “हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. म्हणून ते भूमिका टाळत आहेत. राजकीय पक्षांनी भूमिका घेतल्या तर लोकांसमोर परिस्थिती जाते. जे पक्ष भूमिका घेत नाहीत, ते आपल्या बाजूने नाही असं ओबीसींचं मत होत आहे.”
आता पाहणं महत्त्वाचं ठरेल की, अजित पवार आणि त्यांच्या गटाची प्रकाश आंबेडकर यांच्या या ऑफरवर काय प्रतिक्रिया येते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण निर्माण होऊ शकतं का? हे लवकरच स्पष्ट होईल.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना दिलासा…! राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार?
2 ओव्हर मध्ये 61 धावांची गरज, फलंदाजांनी धु धु धुतलं, 11बॉल मध्ये गेम ओव्हर
धबधब्याच्या ठिकाणी अचानक पाणी वाढलं तर काय करावं? पहा व्हिडीओ