प्रसिद्ध अभिनेत्याचं ३२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
कोरियन इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कोरियन अभिनेता(actor) पार्क मिन जे चं निधन झालं आहे. कोरियन अभिनेत्याचं निधन वयाच्या ३२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले आहे. कोरियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, पार्क मिन जे सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी चीनमध्ये गेला असतानाच अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर आले आहे. अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून त्या पोस्टवर चाहते अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त करीत आहेत.
बिग टायटल एजन्सीने पार्क मिन जे यांच्या निधनाचे वृत्त सर्वात आधी दिली होती. सोशल मीडियावर अभिनेत्याचा(actor) फोटो शेअर करत बिग टायटल एजन्सीने सांगितले की, “पार्क मिन जे, याचे अभिनयाप्रती प्रेम आणि आपुलकी होती. त्याने कायमच आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला.
आता तो आपल्या सर्वांना सोडून गेला आहे. तुम्ही सर्वांनी अभिनेत्याप्रती दाखवलेले प्रेम आणि पाठिंब्याबद्दल अत्यंत आभारी आहोत. यापुढे आपल्याला पार्क मिन जे अभिनय करताना दिसणार नसला तरी एक मोठा अभिनेता म्हणून आपण त्याला कायमच अभिमानाने स्मरणात ठेवू. त्याच्या आत्म्याला शांती लाभो”.
एजन्सीने पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पार्क मिन याचं वयाच्या ३२ व्या वर्षी निधन चीनमध्ये २९ नोव्हेंबर २०२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहे. कोरियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्यावर अंत्यसंस्कार ४ डिसेंबर रोजी सियॉल नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये केले जाणार आहेत आणि तेथे त्यांच्यासाठी शोक सभादेखील आयोजित केली जाणार आहे. त्याच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी हा खूप कठीण काळ आहे. या कठीण काळात पार्कच्या चाहत्यांपासून त्याच्या जवळच्या मित्रांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींनो 2100 रुपये कधीपासून मिळणार?
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रूग्णालयात दाखल करणार
‘तुझ्या आई-वडिलांना जीवे मारेन…’, 13 वर्षांच्या मुलीवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार