मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर

कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘जोधा अकबर’ फेम अभिनेता रवी भाटियाच्या गाडीला भीषण अपघात(accident) झाला आहे. या अपघातात अभिनेत्याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या अपघातात रवी बचावला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली.

10 फेब्रुवारी रोजी मड रोडवर रवी भाटियाच्या कारचा अपघात(accident) झाला. अभिनेत्याने एक्स अकाउंटवरून ट्विट करत याबाबत माहिती दिली. त्याने अपघातानंतर त्याच्या गाडीचे काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यात गाडीची दयनीय अवस्था दिसत आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचेही रवी भाटियाने सांगितले.
ट्विटमध्ये रवी भाटियाने म्हटले आहे की, “10 फेब्रुवारी रोजी मड रोडवर माझ्या कारचा मोठा अपघात झाला. गाडीतील एअर बॅग्ज वेळीच उघडल्या. गाडीची अवस्था पाहता मी जिवंत आहे यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. यासाठी मी रतन टाटा सरांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी सुरक्षिततेला प्राधान्य दिले. कोणालाही दुखापत झालेली नाही.”

रवी भाटियाने अपघाताबद्दल माहिती दिली. तो म्हणाला, “आम्ही अक्सा बीचला जात असताना माझ्या कारला टेम्पोने धडक दिली. त्याआधी संध्याकाळी 4.30 वाजताच्या सुमारास माझी कार दोनदा भिंतीला धडकली होती. देवाच्या कृपेने मला जास्त दुखापत झालेली नाही. काही किरकोळ जखमा झाल्या आहेत, ज्या आता बऱ्या होत आहेत. मोठी दुर्घटना घडली नाही, हे आमचं सुदैव. पण, यात माझ्या गाडीचं खूप नुकसान झालं आहे.”
रवी भाटिया हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. त्याने ‘लाल इश्क’, ‘इश्क सुभानल्लाह’ , ‘हसरतें’ , ‘हमारी बेटी राज करेगी’, ‘चिट्ठी’, ‘दो दिल बंधे एक डोरी से’ आणि ‘सीआयडी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘जोधा अकबर’ मालिकेतही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.
हेही वाचा :
‘मी देवेंद्र फडणवीसांकडे पदर पसरणार…’; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
बुधवारी शिवजयंतीनिमित्त शाळा आणि बँका बंद असणार का?
मस्ती मस्ती 10 व्या मजल्याच्या जिन्यावरून खाली कोसळली अन्… थरकाप उडवणारा Video Viral