प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना पोलिसांनी केली अटक
प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावरुन पोलिसांकडून अटक(singer) करण्यात आली. राहत फतेह अली खान यांना विमानात बसण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी दुबई पोलीस ठाण्यात नेले. रिपोर्टनुसार राहत फतेह अली खानचे माजी मॅनेजर आणि प्रसिद्ध शोबिझ प्रवर्तक सलमान अहमद यांनी दुबईत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अहवालानुसार त्यांना औपचारिक अटक झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी (singer)गायकाविरुद्ध त्याचे माजी व्यवस्थापक सलमान अहमद यांनी तक्रार दाखल केली होती. सिंगरने आपल्याला अन्यायकारकरित्या काढून टाकल्याचा आरोप व्यवस्थापकाने केला होता. नोकरीवरून काढून टाकल्यानंतर सलमानने त्याच्याविरुद्ध दुबईत तक्रार दाखल केली आणि सोमवारी गायकाला अटक करण्यात आली. मात्र, नेमका आरोप कोणता हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र सिंगरच्या मॅनेजमेंट टीमने या अटकेला दुजोरा दिला असून याप्रकरणी अधिक माहिती मिळण्याची वाट पाहत असल्याचे सांगितले आहे.
वादाच्या दरम्यान राहत फतेह अली खान एका म्युझिकल शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी काही दिवस दुबईत होते. गायकाच्या माजी व्यवस्थापकाने त्याचा फायदा घेत त्याच्याविरुद्ध दुबई पोलिसांत तक्रार दाखल केली आणि सोमवारी बुर्ज दुबई पोलिसांनी गायकाला अटक केली.
या गायकाचे नाव वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही, या वर्षी जानेवारी महिन्यात त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये तो आपल्या नोकराला मारहाण करताना दिसत आहे. मात्र, नंतर त्यांनी त्याबद्दल माफीही मागितली.
हेही वाचा :
ST मध्ये चढण्यासाठी शॉर्टकट पडला महागात; थेट खिडकीची चौकट आली हातात Video
खुशखबर! आता सोनं-चांदी होणार स्वस्त, सीमा शुल्कात घट करण्याचा केंद्राचा मोठा निर्णय
भयंकर! घटस्फोटाचा राग, बायको अन् मुलावर अॅसिड फेकलं