तृप्ती डिमरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते संतापले

बाॅलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी कायम सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती रोज नवनवीन फोटो शेअर करत असते. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ॲनिमल या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती.

या चित्रपटात तृप्तीने इंटिमेट सीन दिल्यामुळे एका रात्रीतूनच तृप्ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली. दरम्यान, तृप्ती एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.

जयपुर येथे एका कार्यक्रमात तृप्तीला बोलवण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमात हजर राहण्यासाठी तृप्तीला उशीर झाला. मात्र तृप्तीने पैसे घेतले पण कार्यक्रमात वेळेत पोहोचू शकली नाही. त्यामुळे अनेकांनी तृप्तीवर संताप व्यक्त केला आहे. शिवाय तिच्यावर बहिष्कार टाका, असं देखील लोक म्हणत आहेत. एवढंच नाही तर तृप्तीवर कायदेशीर कारवाई करू, अशी देखील धमकी दिली आहे.

तृप्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने संताप व्यक्त केला आहे. यावेळी ती म्हणते की, ‘कोणीही हिचे सिनेमे पाहाणार नाही. आधी शब्द देतात आणि त्यानंतर येत नाहीत. वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. ही कोणती मोठी सेलिब्रिटी आहे? कोणाला हिचं नाव देखील माहिती नाही. आम्हाला पाहायचं होतं ही नक्की आहे तरी कोण? स्वतःला सेलिब्रिटी बोलावून घेण्याची तिची लायकी नाही.

मी 5 मिनिटांत कार्यक्रम स्थळी पोहोचते असं देखील ती म्हणाली होती. पूर्ण करार 5.5 लाख रुपयांचा झाला होता. तिने आज आमचा अपमान केला आहे, असं म्हणत लोकांनी तृप्ती विरोधात संताप व्यक्त केला..

हेही वाचा :

शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

Bigg Boss Marathi च्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धक घराबाहेर; व्हायरल व्हिडीओने चाहत्यांमध्ये उत्सुकता

स्वतःशी लग्न केलेल्या कुबराने संपवले जीवन: समाजात खळबळ