सलमान खानचा व्हिडीओ पाहून चाहत्यांची चिंता; सोफ्यावरून उठताना त्रास अनुभवला

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (actor)एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 28 ऑगस्ट रोजी व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सलमान खान एका कार्यक्रमात सोफ्यावर बसलेला दिसतो, आणि त्याला सोफ्यावरून उठताना त्रास होतो असे दिसते.

व्हिडीओमध्ये, सलमान खानला उठताना हातांचा आधार घ्यावा लागतो, जो त्याच्या चाहत्यांसाठी चिंता निर्माण करणारा आहे. व्हिडीओ पाहून चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना सलमानच्या वयाची चिंता व्यक्त केली आहे.

चाहत्यांचे मत व्यक्त करताना काहींनी म्हटले की, “आमचा आवडता हिरा आता म्हातारा झाला आहे,” तर काहींनी विचारले की, “आता तो 58 वर्षांचा आहे, तरीदेखील तो असा दिसतोय.”

आणखी एका युजरने म्हटले, “आमच्या लहानपणीचा आवडीचा अभिनेता आता वयस्कर होत आहे आणि आम्ही देखील.” काहींनी सलमानच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असून, “भाई आता थकल्यासारखा आणि म्हाताराही वाटतो,” असे मत मांडले आहे.

सलमान खानच्या या व्हिडीओने त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता आणि तणाव निर्माण केला आहे, आणि त्यांच्या आरोग्याबद्दलची चिंता वाढवली आहे.

हेही वाचा:

पश्चिम बंगालमध्ये बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा – ममता बॅनर्जीची विधेयक सुधारणा प्रस्तावित

पैसेची लाट! मंगळ-चंद्राची युतीने जन्माला येणार ‘महालक्ष्मी योग’; या तीन राशींना मिळणार बक्कळ धन

नोकरीची संधी : भारतीय वायुसेनेतील भरती 2024