जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी बाप, लेकाची अशीही मैत्री.

कोरोनाच्या(corona) महामारीमुळे अनेक कुटुंब उघडे पडले, अनेकांचा आधार गेला तर काहींची कुटूंबच उध्वस्त झाली. आजही अनेक कुटुंब कोरोनाच्या महामारीमध्ये मयत झालेल्या नातेवाईकांच्या आठवणीत जगत आहेत. असेच कल्याणमधील कुटुंब आहे, ते आजही आपल्या मुलाच्या आठवणीत जगत आहे. कल्याणच्या आंबिवलीमध्ये राहणारे जामदार कुटुंब यांचा मुलगा योगेश हा कोरोनाचा शिकार झाला आणि गेली चार वर्षे हे कुटुंब आपल्या मुलाच्या आठवणीला जिवंत ठेवत जगत आहे.

बाप लेकाची अशीही मैत्री

वडील उल्हास जामदार यांनी आपला मुलगा योगेशचा रूम तसाच ठेवलाय. त्या रूमच्या आठवणी, मुलाला रुग्णालयात घेऊन जाणारी गाडी, अशा वेगवेगळ्या आठवणीत वडील जगतात. विशेष म्हणजे त्याचा प्रत्येक वाढदिवस ते आगळ्यावेगळ्या पद्धतीने आजही साजरा करतात. उल्हास जामदार यांचा मुलगा योगेश हा लहानपणापासून किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्याने मुलाचे संगोपन करण्यात वडील व्यस्त राहिले. 

जिंदगी के साथ भी और जिंदगीके बाद भी

किडनीच्या आजारामुळे आणि मुलाला चालता येत नसल्याने बाप लेकाचे नाते एकदम घट्ट झाले होते. आई बनून वडिलांनी 25 वर्षे मुलाचे संगोपन केले आणि मग त्या मुलाचे आणि वडिलांचे नाते मित्रासारखे झाले. मात्र, कोरोनाच्या आजारात मुलगा मयत झाला आणि वडील बेचैन झाले. मुलाच्या आठवणीत बाप अजूनही हरवून गेलेला आहे. कोरोनाच्या महामारीत गेलेल्या मुलाचा बापाला विसर पडला नाही. त्याच्या प्रत्येक आठवणी आजही त्याची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाहीत. 

आजही आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करतात मुलाचा वाढदिवस

मुलगा योगेश कोरोनाच्या महामारीत गेला, मात्र वडिलांची भोळी माया आजही मुलगा आपल्यात आहे, असे समजून मुलाचा वाढदिवस आदिवासी भागात जाऊन केक कापून गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके देऊन, झाडे लावून साजरा करून मुलाच्या आठवणीत गेली चार वर्षे वडील जगत आहेत.

हेही वाचा :

महागाईचा परिणाम दुधावरही! अमूल, मदरनंतर आता परागनेही वाढवले दुधाचे दर

टाटांचा मेगा प्लॅन, थेट मोबाईल क्षेत्रात उडी घेण्याची तयारी, ही कंपनी घेऊन…

राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 9000000 रुपयांच्या फसवणुकीचा आरोप