धाकधूक वाढली! ‘या’ मतदारसंघाची पुन्हा मतमोजणी होणार?
राज्यातील विधानसभा निवडणूक(political news) पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी EVM वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
तसेच राज्यातील अनेक मतदारसंघात(political news) मतांची तफावत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्यात येत आहे. अशातच आता शरद पवार गटाने थेट मैदानातच उडी घेतली आहे. कारण धाराशिवमध्ये फेर मतमोजणीसाठी शरद पवार गटाने मोठी रक्कम भरली आहे.
महाराष्टात महायुतीची सत्ता आली आहे. परंतु, राज्यात काही मतदार केंद्रावर मतदार कमी आणि मतदान अधिक असे धक्कादायक प्रकार समोर आल्याचा दावा विरोधक करत आहेत. तर काही ठिकाणी ऑडियो क्लिपमधून ईव्हीएम हॅकिंग करण्यात आल्याचे समोर आल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. मात्र या निकालावर विरोधक आरोप करत आहेत.
दरम्यान, आता धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात फेर मतमोजणी करण्याची मागणी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचा परंडा या मतदारसंघात निसटता पराभव झाला आहे. परंतु आता राहुल मोटे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. कारण राहुल मोटे यांनी त्यासाठी तब्बल 8.5 लाख रुपये निवडणूक विभागाकडे जमा केली आहेत.
राहुल मोटे यांनी 18 मशीनची पुन्हा फेर मोजणी करण्यासाठी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. कारण अपेक्षित मतदान न मिळालेल्या यंत्रावरील मतांची फेरमोजणी करण्याची राहुल मोटे यांनी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
यावेळी परंडा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्यामध्ये लढत झाली आहे. यावेळी या मतदारसंघात तानाजी सावंत यांनी 1509 मताने विजय मिळवला आहे. कारण तानाजी सावंत यांना 1 लाख तीन हजार 254 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोटे यांना 1 लाख 1 हजार 745 एवढे मतदान झाले आहे. मात्र त्यानंतर मोटे यांनी फेत मतमोजणीची मागणी केली आहे. परंतु, आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचा :
महिन्याच्या शेवटी ग्राहकांना दिलासा, सोनं ‘इतक्या’ हजारांनी झालं स्वस्त?
आता महागाईमुळे आंघोळही महाग होणार, ‘या’ साबणांच्या किमती वाढणार
“आंबेडकरी समाज दुःखात बुडालेला असताना…”; शपथविधीबाबत ‘या’ नेत्याची मोठी मागणी