अखेर धनंजय मुंडेंची हकालपट्टी!

अखेर मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या पदाचा राजीनामा(political) दिला आहे. धनंजय मुंडेंचे पीए मुंडेंच्या राजीनाम्याच पत्र सागर बंगल्यावर घेऊन गेले आहेत. अशातच आता मुख्यमंत्र्यांना राजीनाम्याचे पत्र दिल्यानंतर ते राजीनाम्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणात मोठा राजकीय(political) दबाव निर्माण झाल्यानंतर अखेर 82 दिवसांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा स्वीकारला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले होते. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विशेषतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारवर जोरदार टीका करत मुंडेंच्या बडतर्फीची मागणी केली होती. अखेर वाढत्या दबावाला शरण जात मुंडेंनी आपले मंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवगिरी बंगल्यावर बैठक घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

अहो आश्चर्यच! आता सोलार एनर्जीवर चालणार तुमचा स्मार्टफोन, चार्जिंगचीही गरज नाही! 

संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संताप

1500 की 3000 संभ्रम दूर लाडकीला महिला दिनाचं गिफ्ट मिळणार पाहा स्पेशल रिपोर्ट