वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सगळ्यांकडून दंड वसूल केला जाणार
वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी – RC) आणि सारथ्य परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स – Driving Licence) आता आधारशी जोडण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम(traffic rules) मोडणाऱ्यांवर कारवाई करणे त्यामुळे सोपे होणार आहे.
वाहतुकीचे नियम(traffic rules) तोडणारे अनेक लोक विविध युक्ती-प्रयुक्त्या करून दंडापासून वाचत असतात. मोबाईल क्रमांक किंवा पत्ता बदलण्याची युक्ती त्यात प्रामुख्याने वापरली जाते. आरसी आणि लायसन्स आधारशी जोडल्यानंतर या प्रकाराला आळा बसेल. सूत्रांनी सांगितले की, परिवहन विभागाच्या डेटा बेसमध्ये कित्येक वाहने 60, 70 आणि 90 च्या दशकातील आहेत. त्यांच्याशी संबंधित कोणतीही माहिती अद्ययावत नाही.
12,000 कोटींचा दंड प्रलंबित :
वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडे तब्बल 12,000 कोटींचा दंड प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.
असा होईल परिणाम :
पत्ता व मोबाईल क्रमांक अद्ययावत झाल्यानंतर दंड वसुलीसाठी कुठे संपर्क साधायचा याची माहिती उपलब्ध होईल. त्यानुसार पाठपुरावा होईल, असे परिवहन विभागाने सांगितले.
थोडक्यात, आरसी आणि लायसन्स आधारशी जोडल्याने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. तसेच प्रलंबित दंड वसुलीलाही गती मिळणार आहे.
हेही वाचा :
राज्यात मात्र पाऊस- गारपीटीची शक्यता; पुढील 24 तासांत नेमकं काय होणार?
ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘NPCL’चे उद्यापासून नवे नियम
रेल्वे ट्रॅकवर बसून गर्लफ्रेंडशी गप्प मारत होता पठ्ठ्या इतक्यात…; VIDEO पाहून उडेल थरकाप