अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR दाखल
बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे(actor) आणि आलोकनाथ यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण इंदूरमध्ये नोंदणीकृत असलेल्या सोसायटीतील 50 लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेलेल्या कंपनीच्या प्रमोशनशी संबंधित आहे. हा एफआयआर हरियाणातील सोनीपतमध्येनोंदवण्यात आला आहे.
श्रेयस तळपदे(actor) आणि आलोकनाथ यांच्याविरुद्ध गुंतवणुकीचं आवाहन करत कंपनीची जाहीरात केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या कंपनीच्या कार्यक्रमात सोनू सूद देखील प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.
पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, या कंपनीनं 6 वर्षांपूर्वी लोकांकडून पैसे वसूल केले. कंपनीत फिक्स्ड डिपॉझिट किंवा इतर मार्गांनी गुंतवणूक केल्यास लोकांना मोठ्या परताव्याचं आश्वासन देण्यात आलं. एवढंच नाही तर, लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी महागड्या आणि मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित केले गेले आणि प्रोत्साहनांच्या नावाखाली बहु-स्तरीय मार्केटिंगच्या धर्तीवर एजंट तयार केले गेले.
सुरुवातीला कंपनीनं काही लोकांना पैसे दिले, पण जेव्हा कोट्यवधी रुपये जमा झाले, तेव्हा प्रकरण वेगळ्याच वळणावर गेलं, असं सांगितलं जात आहे. आता कंपनी पैसे देण्यास कानकूस करत होती आणि जेव्हा लोकांनी पैसे मागू लागले, तेव्हा कंपनीचे अधिकारी त्यांचे मोबाईल बंद करू लागले.
कंपनीनं 2023 मध्ये आपले खरे रंग दाखवले. मोठमोठे दावे करून आणि आमिषं दाखवून अनेक वर्षे आपला खरा हेतू लपवला आणि जेव्हा हळूहळू लोकांनी कंपनीच्या सदस्यांवर फसवणुकीचे आरोप करायला सुरुवात केली, तेव्हा कंपनीच्या मालकांनी त्यांच्या एजंट आणि गुंतवणूकदारांशी असलेले सर्व संबंध तोडले. जेव्हा लोक कार्यालयात गेले आणि गोंधळ घालू लागले, तेव्हा त्यांना तिथेही कुलूप लावलं.
सर्व अधिकारी आणि कर्मचारी लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेले. एजंट्सद्वारे चालवली जाणारी 250 हून अधिक सुविधा केंद्र होती आणि वरिष्ठ अधिकारी फक्त ऑनलाईन पद्धतीनं काम करत होते. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तळपदे आणि आलोकनाथ यांच्याव्यतिरिक्त एकूण 11 जणांची नावं आहेत.
या मार्केटिंगमध्ये जर एखाद्या एजंटनं जास्त लोकांना जोडलं तर, त्याला बक्षिस म्हणून ट्रॉफी दिली जायची. या कंपनीला प्रमोट करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिची श्रेयस तळपदेलाही हायर करण्यात आलं होतं. असं सांगितलं जात आहे की, काही इन्वेस्टर्डनी या प्रकरणात पंजाब आमइ हरियाणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणात 25 जानेवारीला कोर्टात सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये सोसायटीच्या अधिकाऱ्यांना जबाब द्यावा लागणार आहे.
हेही वाचा :
सध्याच्या परिस्थितीवर शरद पवारांनी केलं मोठं विधान; म्हणाले, ‘राज्यात एकप्रकारे…’
वीरेंद्र सहवागच्या संसारात वादळ, पत्नी आरतीला देणार घटस्फोट? चर्चांना उधाण..
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा ओनियन चीझ टोस्ट