विधानसभेपूर्वी सांगलीत फटाके फुटणार, जयंत पाटील अन् विश्वजीत कदम आमने-सामने?

सांगली लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील(general assembly) यांच्यात थेट लढत झाली. पण, या निवडणुकीत चौथे ‘पाटील’ अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा चर्चेत होते. जयंत पाटलांमुळेच सांगलीची जागा मिळाली नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर करण्यात येतो.

परंतु, लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी बाजी मारत विजय खेचून आणला. पण, निवडणुकीनंतरही(general assembly) जयंत पाटील आणि सांगली काँग्रेसच्या नेत्यांमधील धुसफूस कमी होताना दिसत नाही.

जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील 3 ते 4 जागा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनीही सांगली जिल्ह्यातील 4 ते 5 जागांवर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विश्वजीत कदम यांच्या घोषणेने सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस, असा संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

“सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आर्शीवादानं मला राज्य पातळीवर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे कुणी काही बोलो विधानसभेला सांगली जिल्ह्यात 4 ते 5 जागांवर काँग्रेस 100 टक्के निवडणूक लढणार आहे,” असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं.

“लोकसभा निवडणुकीत आमदार मानसिंह नाईक यांच्या मतदारसंघातून 9 हजारांचं मताधिक्य मिळालं. मानसिंह नाईक यांच्यासाठी निवडणुकीत आपल्याला अधिक ताकदीनं लढलं पाहिजे. तासगाव, कवठेमहांकाळमध्ये काही अडचण असल्याचं मला वाटत नाही. त्यामुळे या तीन जागा राष्ट्रवादीच्या 100 टक्के निवडून येतील. आणखी एखादी-दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे,” असं जयंत पाटील म्हणाले होते.

हेही वाचा :

मोदी सरकार PMAY 2024 अंतर्गत 3 कोटी घरे बांधणार, पाहा कसा करावा अर्ज

कमी होणार कराचा बोजा? GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

भाजप विधानसभा स्वबळावर लढणार? शिंदे, पवारांना दूर ठेवण्याची तयारी…