माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भीषण अपघात….

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांच्या ताफ्याचा आज भीषण अपघात(accident) झाला. यात चार पोलीस जखमी झाले आहेत. पाली जिल्ह्यातील रोहत आणि पनिहारी चौकानजीक ही दुर्घटना घडली. वसुंधरा राजे पाली जिल्ह्यातील बाली येथे कॅबिनेट मंत्री ओटाराम देवासी यांच्या आईच्या निधनाचे सांत्वन करण्यासाठी गेल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅबिनेट मंत्री ओटाराम देवासी यांच्या आईचं निधन झालं होतं. त्यांच्या सांत्वनासाठी वसुंधरा राजे पाली जिल्ह्यातील बाली येथे गेल्या होत्या. तिथून परतताना पाली जिल्ह्यातील रोहत आणि पनिहारी चौकानजीक ताच्या ताफ्याच्यामध्ये एक दुचाकीस्वार आला.

त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात(accident) झाला, त्यात पोलिसांची बोलेरो महादेव हॉटेलजवळ नियंत्रणाबाहेर गेली आणि उलटली.वसुंधरा राजे यांनी तातडीने खाली उतरून जखमी पोलिसांना ॲम्ब्युलन्समधून बाली रुग्णालयात पाठवले. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

वसुंधरा राजे यांनी जखमी पोलिसांना तातडीने रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली आणि जखमींशी संवाद साधला. त्यांनी जखमींना योग्य उपचारासाठी शासकीय रुग्णालयात बाली येथे पाठवले. तसंच बालीचे आमदार पुष्पेंद्र सिंह यांना सोबत पाठवून दिलं. प्राथमिक उपचारानंतर पोलिसांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.।

मात्र, सुदैवाने माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे कोणतेही नुकसान झाले नाही किंवा त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. साधारणत: ताफ्यातील वाहने एकाच्या मागे असतात, त्यात एकाला धडकल्यास दुसऱ्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता असते.

हेही वाचा :

सांगलीतून रुपाली चाकणकर यांचा मोठा दावा; म्हणाल्या, आता आमच्या पक्षात…

छगन भुजबळांची रणनीती ठरली? ‘त्या’ बैठकीनंतर घेणार मोठा निर्णय

शिंदेंची खेळी यशस्वी? अजितदादांकडं तिजोरीच्या चाव्या पण, खर्च शिंदेच करणार