धावत्या बसमध्ये माजी आयएएस अधिकाऱ्याला मारहाण, कंडक्टरचं संतापजनक कृत्य Video

जयपूरमध्ये धावत्या बसमध्ये ७५ वर्षीय माजी आयएएस अधिकाऱ्याला(IAS officer) बस कंडक्टरने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी कंडक्टरने माजी अधिकाऱ्याला त्यांचा स्टॉप चुकला. त्यानंतर माजी अधिकाऱ्याने पुढच्या स्टॉपवर उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, कंडक्टरने त्यांच्याकडे अतिरिक्त १० रुपये मागितले.

परंतु, माजी अधिकाऱ्याने स्पष्ट नकार दिला. यामुळे दोघांत वाद पेटला. या वादातून कंडक्टरने माजी अधिकाऱ्याला मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. याप्रकरणी संबंधित बस कंडक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

कानोताचे स्टेशन हाऊस ऑफिसर उदय सिंह यांनी सांगितले की, माजी आयएएस अधिकारी(IAS officer) आरएल मीणा आग्रा रोडवरील कानोता बसस्थानकावर उतरणार होते. मात्र, बस कंडक्टरने कल्पना न दिल्याने त्यांचा स्टॉप चुकला. यामुळे त्यांनी नायला येथील पुढील स्टॉपवर उरतायचे ठरवले.

मात्र, बस कंडक्टरने त्यांच्याकडून अतिरिक्त १० रुपये मागितले. पण मीणा यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि वादाला सुरुवात झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर बस कंडक्टरने मीणा यांना मारहाण केली. घनश्याम शर्मा असे कंडक्टरचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

@1K_Nazar या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘एका कंडक्टरने निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मारहाण केली. शासनाने अशा लोकांना कायद्याचे अस्तित्व लक्षात आणून द्यावे. हा व्हिडिओ जयपूर शहरातील आहे.

काहीही असो पण वृद्ध व्यक्तीसोबत असे वर्तन अजिबात योग्य नाही. अशा व्यक्तीविरोधात ताबडतोब कारवाई करण्यात यावी.’ या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेनंतर आयएएस अधिकाऱ्याने कानोटा पोलीस ठाण्यात संबंधित बस कंटक्टरविरोधात फिर्याद दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बस कंडक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर कंडक्टर घनश्याम सेवेवरून निलिंबित करण्यात आले.

हेही वाचा :

तिसऱ्यांदा लग्न करतोय हा सुपरस्टार? वाढदिवसाच्या पार्टीत नटूनथटून पोहोचलेली अभिनेत्री

धावत्या बाईकवर रोमान्स करणं जोडप्याला पडलं महागात; पोलिसांनी पकडले अन्…, Video

‘मला जीवे मारण्याची धमकी…’, मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची लक्ष्मण हाकेंची मागणी