भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन: कॅन्सरशी झुंज अपयशी
क्रिकेटच्या(cricket) मैदानात हार न मानणारे दिग्गज माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे. रक्ताच्या कर्करोगामुळे त्यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते.
अंशुमन गायकवाड यांनी ४० कसोटी व १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसेच त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि राष्ट्रीय निवड समिती सदस्य म्हणूनही काम केले होते.
लंडनमध्ये गेल्या काही काळापासून गायकवाड यांच्यावर रक्ताच्या कर्करोगासाठी उपचार सुरू होते. त्यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये उपचार घेतले होते आणि गेल्या महिन्यातच ते भारतात परत आले होते. त्यांच्या उपचारांसाठी बीसीसीआयने एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली होती, तसेच १९८३ सालच्या भारतीय विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंनीही त्यांना आर्थिक मदत केली होती.
अंशुमन गायकवाड यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे.
हेही वाचा:
आयएएसमधून पूजा खेडकरांना डच्चू; यूपीएससीची कडक कारवाई,
“अधिक जगण्याची इच्छा नाही” राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची उद्विग्न प्रतिक्रिया
पुष्पा २ चा लीक झालेला व्हिडीओ व्हायरल, चाहते चित्रपटाच्या निर्मात्यांवर संतप्त