‘बुधवार’चे भविष्य: ‘या’ राशींवर होईल धन-धान्याचा वर्षाव, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे!

‘बुधवार’चे भविष्य: ‘या’ राशींवर(daily horoscope) होईल धन-धान्याचा वर्षाव, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे!

मेष:- आपल्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची छाप पाडाल. जोडीदाराशी सुसंवाद घडेल. मुलांबद्दल चांगली बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात काही बदल घडून येतील. आत्मसन्मान बाळगून वागा.

वृषभ:- बोलण्यात माधुर्य ठेवा. घरातील कामांना वेग येईल. व्यावसायिक गैरसमज टाळा. सामाजिक भान राखून वागावे. मानसिक शांतता लाभेल.

मिथुन:- आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. हरवलेली वस्तु सापडेल. जोडीदाराच्या कलेचे कौतुक कराल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहील. भगवंताचे नामस्मरण करावे.

कर्क:- उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. मानसिक गोंधळ टाळावा. जोडीदाराच्या मतांचा आदर करावा. समस्येतून प्रयत्नाने मार्ग काढावा. निराश होऊ नका.

सिंह:- गोष्टी मनासारख्या घडतील. मुलांशी सुसंवाद साधता येईल. गोड बोलून कार्यभाग साधावा. वाणीत माधुर्य ठेवावे. समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सापडेल.(daily horoscope)

कन्या:- उगाच नसत्या भानगडीत स्वत:ला गुंतवू नका. प्रेमातील गोष्टी लांबणीवर पडू शकतात. नोकरीत प्रशंसा होईल. मन विचलीत होऊ देऊ नका. वडीलधार्‍यांचा सल्ला मोलाचा ठरेल.

तूळ:- घरातील जुन्या कामात अडकून राहाल. अटीतटिचे वाद वाढवू नका. वाचनात वेळ घालवावा. प्रलंबित कामात मित्रांची मदत घ्याल. बचतीच्या योजना आखाल.

वृश्चिक:- घरातील जुन्या वस्तूंचा शोध घ्याल. व्यावसायिक कामात बदल जाणवेल. अभ्यासाचा कंटाळा करू नका. कामकाजात सुधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. प्रलंबित कामांना प्राधान्य द्यावे.

धनू:- धार्मिक गोष्टींच्या सानिध्यात राहाल. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ मिळेल. धनवृद्धीचे संकेत मिळतील. स्वत:च्या हिंमतीवर मार्ग काढाल. भावंडांकडून शुभ वार्ता मिळेल.

मकर:- अचानक धनलाभाची शक्यता. गरम वस्तूंपासून दूर राहावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. निष्काळजीपणा नुकसान करू शकतो. भागीदारीत सतर्क राहावे.(daily horoscope)

कुंभ:- जुन्या गोष्टी मार्गी लागतील. ग्रहयोग वृद्धीकारक ठरेल. विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल.

मीन:- घरासाठी मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. प्रयत्नांची कास सोडू नका. व्यापारी वर्गासाठी सामान्य दिवस.

हेही वाचा:

हवामानात अनपेक्षित बदल; दुपारी उकाडा आणि सायंकाळी पावसाची रिमझिम

अजित पवार गटाला दोन आठवड्यांचा वेळ; जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

सकाळी चहा-कॉफी ऐवजी रिकाम्या पोटी पाणी प्या, जाणून घ्या फायदे..