७५ रुपयांचे मोफत पेट्रोल अन् १००० रुपयांचा कॅशबॅक भारत पेट्रोलियमची खास ऑफर

सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. भाज्यांपासून ते इंधनाचे दर गगनाला (Petroleum)भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. इंधनाचे दर काही केल्या कमी होत नाहीयेत. जवळपास गेल्या वर्षभरापासून पेट्रोल- डिझेलचे दर वाढतच आहेत. दरम्यान, अशातच सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियमने वाहनधारकांसाठी मस्त ऑफर आणली आहे.आता भारत पेट्रोलियमवर ७५ रुपयांमध्ये मोफत पेट्रोल मिळणार आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना खूप फायदा होणार आहे. कंपनीची ही ऑफर २८ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

भारत पेट्रोलियमचा २८ फेब्रुवारीला वर्धापन दिन आहे. त्यासाठी ही ऑफर दिली आहे. यामध्ये तुमचे वय जर १८ वर्षांपेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला ऑफर मिळणार आहे. यामध्ये कंपनीचे कर्मचारी, डीलर्स, वितरक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. ज्या राज्यांमध्ये (Petroleum)आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशा ऑफरवर बंदी आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

जर तुम्हाला ७५ रुपयांमध्ये मोफत पेट्रोल मिळवायचं असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर पेट्रोल पंपावर नोंदणी करावी लागेल. तुम्हाला १००० रुपयांचा कॅशबॅकदेखील मिळणार आहे.यासाठी तुम्हाला पेट्रोलियम पंपावरुन पेट्रोसह MAK 4T इंजिन ऑइलचा एक पॅक खरेदी करावा लागणार आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच, जाणून घ्या पेट्रोल (Petroleum)आणि डिझेलचे बदललेले दरइंडियन ऑइल खरेदी केल्यानंतर तुम्हाला लगेचच ७५ रुपयांचे पेट्रोल मोफत मिळणार आहे. तुम्ही भारत पेट्रोलियम पंपावर जाऊन इंजिन ऑइलदेखील बदलू शकणार आहात.यानंतर तुम्हाला एक क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला १००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅकदेखील मिळणार आहे. या ऑफरचा फायदा एका मोबाईल नंबरला फक्त एकदाच मिळणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना ७५ रुपयांपर्यंतचे पेट्रोल आता मोफत मिळणार आहे.

हेही वाचा :

धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार..

हार्दिकच्या गर्लफ्रेंडने सगळ्यांसमोर केलं असं काही, पाहा व्हायरल व्हिडीओ!

काय सांगता! शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला ? नेमकं कारण काय ?