सोशल मीडियावरची मैत्री दिल्लीतील तरुणीची अकोल्यात हत्या
दिल्लीतील तरुणीची अकोल्यात हत्या झाल्याची घटना घडली आहे.(friendship) डोक्यात अधिक वार झाल्यामुळे तरूणीचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.दिल्लीतील २६ वर्षीय तरुणीची अकोल्यात हत्या झाल्याचं समोर आलंय. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर शहरातील प्रतिक नगरात हे हत्याकांड घडलं आहे. सोबत राहणाऱ्यामित्रानेच तिचा खून केल्याचा संशय मूर्तिजापुर पोलिसांना आहे. तरुणीच्या डोक्यावर अधिक वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
शांतीक्रिया प्रशांत कश्यप वय 26 असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे, तर कुणाल उर्फ़ सनी महादेव शृंगारे असं तिच्या सोबत राहणाऱ्या मित्राचं नाव आहे. दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. कुणालनं काम देतो म्हणून शांतीक्रियाला अकोल्यातल्या मूर्तिजापुर(friendship) शहरात बोलावून घेतलं होतं. त्यानंतर दोघे सोबत राहू लागले होते. मात्र, काल २३ जुलै रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, अन् रागाच्या भरात कुणालने तिच्या डोक्यावर धारदा
शांतिक्रीया २१ जुलै रोजी मुर्तीजापुर शहरात दाखल झाली होती. कुणाल तिला घेऊन वैशाली वाईन बारमध्ये काम मागण्यासाठी गेला होता. मात्र, बार मालकानं काम द्यायला स्पष्ट नकार दिला, त्यानंतर दोघेही तिथून परतले. विशेष म्हणजे कुणाल पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच बारमध्ये वेटरचं काम करत होता. त्यानंतर दोघेही प्रतिक नगरमध्ये खोली घेवून राहत होते. कुणालला दारू पिण्याचं व्यसन होतं. विशेष म्हणजे हत्येच्या घटनेपासून कुणाल फरार आहे, अशी माहिती मूर्तिजापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी ‘साम’शी बोलतांना दिली.
आज सकाळी घरमालक शुभम महाजन यांना खोलीत शांतिक्रियाचा मृतदेह दिसूनआला. लागलीच त्यांनी या संदर्भात मूर्तिजापूर शहर पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी(friendship)दाखल झाले. सध्यास्थित पंचनामा करून मृतदेह वैद्यकिय तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. कुणालच्या शोधार्थ पोलिसांच्या स्थानिक शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांचे विविध पथक रवाना करण्यात आलेत. लवकरच मारेकऱ्याला गजाआड करू, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
हेही वाचा :
पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल? हे हेअर मास्क ठरतील फायदेशीर;
कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प
चिपळूणमध्ये बनावट नोटा छापण्याचे रॅकेट उद्ध्वस्त, चौघे अटकेत