३ महिन्यात ३० किलो वजन वाढलं, मौनी रॉयने ‘तो’ कठीण काळ सांगत मांडली व्यथा
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने अनेक टेलिव्हिजन सीरियल्स, चित्रपट आणि वेब सीरिजच्या(difficult words)माध्यतून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘क्यूं की साँस भी कभी बहू थी’या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेतून मौनीने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं; तर ‘नागिन’ मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली आहे. ‘नागिन’मालिकेची ऑफर येण्याआधी मौनी एका गंभीर आजारामुळे त्रस्त होती. त्याबद्दल एका मुलाखतीत तिनं खुलासा केला आहे.
‘नागिन’मालिकेची ऑफर(difficult words) येण्याआधी मौनीचं वजन ३० किलोने वाढले होते. मुलाखतीदरम्यान मौनीने तिचं इतकं वजन कसं वाढलं ? ते वजन कमी करण्यासाठी तिने काय काय केलं ? या सर्वाची माहिती तिने ह्या मुलाखतीमध्ये दिली आहे. नुकतंच अभिनेत्रीने बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या तब्येतीबद्दल भाष्य केलं आहे.
मुलाखतीमध्ये मौनी रॉय म्हणते, “मी ७ ते ८ वर्षांपूर्वी खूप आजारी पडले होते. त्या काळात मी खूप गोळ्या आणि औषधं खायचे. मला L4-L5, कॅल्शियम स्टोन्स आणि स्लिप्ड डिस्क डिजरटेशन हा आजार झाला होता. त्यामुळे मी पुर्णत: तीन महिने बेडवरच झोपून काढली होती. त्या तीन महिन्यात माझं ३० किलो वजन झालं होतं. त्या काळात मला वाटलेलं की आता माझं आयुष्य संपलं. त्या काळात माझ्याकडे कोणीही पाहिलं नाही. त्याच काळात मला नागिनची ऑफर आली होती. ”
मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिचं वजन कसं कमी केलं ? याविषयी सुद्धा सांगितलं. मौनी म्हणाली, “मी माझं वजन कसं कमी करू ? नेहमीच या विचारात मी राहायचे. एकदा तर मी गोळ्या- औषधंही खाण्याचे सोडले होते, खरं तर त्याचमुळे माझं खूप प्रमाणात वजन कमी झालं. त्याशिवाय मी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या फळांचा ज्यूसही प्यायचे. पोटात काही नसल्यामुळे माझी चिडचिडही खूप व्हायची. त्यामुळे मी थोडंथोडं खाऊही लागली.” असं अभिनेत्रीने सांगितले. त्यासोबतच तिने वजन कमी करण्यासाठी न्यूट्रिशियनचीही मदत घेतल्याचे सांगितले.
हेही वाचा :
अभियांत्रिकी प्रवेशासाठी दुसरी यादी आज जाहीर होणार
आज गोकुळाष्टमी! कृष्णाच्या कृपेने ‘या’ 5 राशीचं नशीब उजळणार
पंतप्रधान मोदींचा कडक संदेश: महिला अत्याचार हे अक्षम्य पाप, मिंधे आणि फडणवीसांना बजावले