हरियाणाच्या अरावली टेकड्यांमध्ये एक मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारला जाणार आहे. १०,००० एकरवर(gantt chart) पसरलेला हा प्रकल्प निसर्ग, वन्यजीवन आणि पर्यटनाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल.
वन्यजीवन आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी जंगल सफारी केली जाते. जंगल सफारीसाठी देशात अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत मात्र अलिकडेच देशातील हरीयाणा राज्यात एक मोठा जंगल सफारी प्रकल्प बांधला जाणार आहे. माहितीनुसार, हरीयाणातील अरावली टेकड्यांमध्ये हा सफारी प्रकल्प उभारला जाणार आहे, जो केवळ पर्यावरणीय(gantt chart) पर्यटनाला चालना देणार नाही तर पर्यावरण संवर्धन आणि विकासाचे उदाहरण देईल. चला या प्रकल्पाविषयी काही सविस्तर बाबी जाणून घेऊया.
हरीयाणात उभारण्यात येणारी ही जंगल सफारी १०,००० एकर जमिनीमध्ये पसरलेली असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ती देशातीलच काय तर संपूर्ण आशियातील सर्वात मोठी सफारी बनू शकते. हरीयाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्ये पसरलेल्या टेकड्यांमध्ये ही सफारी बांधली जाईल. येथे अनेक प्राणी-पक्ष्यांना आसरा देऊन त्यांच्यासाठी एक(gantt chart) नैसर्गिक वातवरण तयार केले जाईल, जेणेकरुन ते आरामात इथे राहू शकतील. यामुळे पर्यटकांना जवळून प्राण्यांना पाहता येईल आणि त्यांच आयुष्य जवळून पाहण्याची संधी मिळेल.
गुजरातच्या वनतारा माॅडेलमधून घेतली प्रेरणा
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, केंद्रिय मंत्री मनोहर लाल आणि पर्यावरण मंत्री नरबीर सिंह यांनी अलिकडेच गुजरातमधील जामनगर येथील ‘वंतारा’ प्राणी बचाव क्रेंद्राला भेट दिली. तिथे त्यांनी प्राण्यांची काळजी, पर्यावरण संरक्षण आणि पर्यटन कसे एकत्र आले ते पाहिले. यातूनच प्ररणा घेऊन हरियाणातील जंगल सफारीमध्येही अशाच आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पर्यावरणपूरक डिझाईनचा वापर केला जाणार आहे. हे स्थळ फक्त पर्यटनापूरतेच मर्यादित राहणार नाही तर एक पर्यावरण संवर्धन अभियान असणार आहे. या जंगल सफारीमध्ये निसर्गात फार कमी हस्तक्षेप केला जाईल असे सरकारने म्हटले आहे. वाढत्या पर्यटनामुळे इथे तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, ज्यामुळे या भागीतील अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल.
या प्रकल्पाद्वारे, हरियाणाला ग्लोबल टूरीजम मॅपवर आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. इथे प्राण्यांना फक्त पिंजऱ्यात बंद करण्यात येणार नाही तर त्यांना साजेशे असे नैसर्गिक वातावरण तयार केले जाईल. फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी ही योजना आखली जात आहे. एकंदरीतच या योजनेद्वारे फक्त राज्याचाच नाही तर देशाचाही मोठा फायदा होईल. ही योजना योग्य रीत्या राबवली गेली तर देशातील इको-टूरिझमसाठी हे एक उत्तम उदाहरण बनू शकते.
हेही वाचा :
- राज्यात लवकरच ‘या’ पदांसाठी महाभरती होणार; फडणवीसांनी दिली गुडन्यूज
- सावधान! आज राज्यात जोर’धार’, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अन् यलो अलर्ट
- यवतमाळमध्ये काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार उघड; मजुरांच्या खात्यातून 100 कोटींची उलाढाल, पोलिसांचा सहभाग