धबधब्यात भिजणे तरुणांना पडले महागात, पोलीस आले अन् कपडे …
पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणांचे सौंदर्य (clothes)आणखीनच खुलून येते. या ऋतूत अनेक पर्यटक फिरण्याचा प्लॅन करत असतात. मात्र या पावसाळ्यात फिरायला जाताना विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. कारण या ऋतूत अनेक दुर्घटना घडत असतात. त्यामुळेच या ऋतूत अनेक ठिकाणांवर जाण्यास बंदी केली जाते. मात्र तरीही काही उत्साही पर्यटक आपल्या जीवाची पर्वा न करता अशा जागी मजा करायला जातात आणि अनेकदा आपला जीव गमावून बसतात.
असाच एका ठिकाणी धबधब्याखाली काही तरुण भिजत(clothes) असताना अचानक पोलीस येऊन त्यांनी यावर अनोख्या पद्धतीने कारवाई केली आहे. या प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.
ही घटना कर्नाटकातील चिकमंगलूर आलेखान फॉल्स चारमाडी येथील आहे. येथे फार आकर्षक धबधबे आहेत, जे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. मात्र येथील काही धबधब्यात जाण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. मात्र तरीही काही पर्यटक बंदी असलेल्या धबधब्यावर पोहोचले आणि धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेऊ लागले. नंतर या घटनेची माहिती मिळताच पोलीस या ठिकाणी पोहचले.
आता तुम्हाला वाटेल की पोलिसांनी त्यांना भिजण्यापासून रोखले असेल किंवा त्यांची खरडपट्टी काढली असावी मात्र असे काही झाले नाही. पोलीस आले आणि त्यांनी त्या तरुणांचे कपडे घेऊन काही अंतर खाली उतरले. यांनतर ते तरुण आपले कपडे मिळवण्यासाठी पोलिसांकडे विनवणी करू लागले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे आणि लोक या व्हिडिओची चांगलीच मजा लुटत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तरुणांवर कोणतीही कडक कारवाई केलेली नाही. पोलिसांनी त्यांना कडक ताकीद दिली आणि शेवटी त्यांचे कपडे परत केले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @Amit Upadhy नावाच्या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, दंड ठोठावण्यापेक्षा धडा शिकवण्याचा हा मार्ग चांगला आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, एखाद्याला मारहाण करण्यापेक्षा त्याला लाज वाटेल अशी शिक्षा करणे चांगले.
हेही वाचा :
रशियन मॉडेल अन् हार्दिक पाड्यांचं नातं काय? अखेर तिनेच गुपित उलगडलं
फुटलेल्या 8 आमदारांची काँग्रेसमधून हकालपट्टी होणार?
पती-पत्नी रेल्वे रुळावर सेल्फी काढण्यात मग्न, अचानक समोरून आली ट्रेन अन्…