“रीलसाठी घोरपडीला श्वानांपुढे टाकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल!”

सध्या रीलचे वेड लोकांना अशाप्रकारे जडले आहे की यासाठी लोक वाटेल(reel video) त्या थराला जायला बघतात. आपल्याला व्हायरल होता यावे यासाठी लोक नको ते करायला बघतात. या गोष्टीची प्रचिती आपल्याला नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा व्हिडिओजमधून मिळत असते. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्हीही असे व्हिडिओज कधी ना कधी नक्कीच पाहिले असावेत. आता देखील सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यात माणुसकीला काळिमा फासणारे विकृत कृत्य दिसून आले. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला थक्क तर करतीलच मात्र तुमचा रागाचा पाराही वाढवतील.

ही घटना पंजाबमधील जालंधरमध्ये घडून आली. व्हिडिओत तरुणाने व्हायरल होण्यासाठी जिवंत घोरपडीला धक्कादायक बाब म्हणजे यावेळीश्वानांच्या पुढ्यात टाकल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी घोरपडीचे पाय हे दोरीने बांधून ठेवले होते, ज्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी तिला कोणताही प्रयत्न करता आला नाही. श्वानांनी फार निर्घृणपणे घोरपडीची हत्या केली आणि ही सर्व घटना तरुणाने आपल्या (reel video) फोनच्या कॅमेरात कैद करत सोशल मीडियावर शेअर केली. माणूस आपल्या स्वार्थ्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याचे उत्तम उदारहण या व्हिडिओतून सर्वांना दिसून आले.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मनदीप असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. इंस्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घोरपडीला बांधून श्वानाच्या समोर टाकले आहे. यावेळी पिसाळलेला श्वान घोरपडीवर हल्ला चढवतात आणि अक्षरशः आपल्या तोंडात पकडून, खेचत तिची शिकार करतात. यावेळी घोरपडीचे हात-पाय बांधून ठेवलेलेही यात दिसून येतात, ज्यामुळे तिला कोणतीही हालचाल करता(reel video) येत नाही. या सर्व विकृत घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पंजाब पोलिसांनी तरुणास अटक केली आहे.

हा व्हायरल व्हिडिओ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे तुला अक्कल आहे का? तुझ्या मेंदुवर काहीतरी परिणाम झाला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे , “कृपया याला अटक करा”.

हेही वाचा :

‘असुरन’ नंतर वेत्रीमारन आणि धनुष आले एकत्र, चित्रपटासाठी केली हातमिळवणी!

‘भूल भुलैया २’ नंतर या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार तब्बू, पुन्हा साकारणार लक्षवेधी भूमिका!

हिवाळ्यात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संसर्गाचा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि त्यावरील उपाय