राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मिळणार मोफत; काही अडचणी असल्यास ‘या’ क्रमांकावर करा संपर्क…
मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे (state)प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या(state)मुलींचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक व हेल्प डेस्क सुरू केला आहे.
ही हेल्पलाईन ०७९६१३४४४०, ०७९६९१३४४४१ या क्रमांकावर आणि helpdesk.maharashtracet.org यावर संपर्क करावा, ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत आहे. या हेल्पलाईनचा उपयोग करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा :
देशभरातील पावसाचे विश्लेषण: राज्यात सरासरीपेक्षा २७% अधिक पाऊस
बीसीसीआयकडून मोठी अपडेट: भारत-विरुद्ध बांगलादेश आणि इंग्लंड मालिकेतील बदल
‘बिग बॉस मराठी’मध्ये अंकिता आणि घन:श्याममध्ये तणाव: अंकिताचा घन:श्यामवर प्रचंड आक्षेप