भाजपला दे धक्का… हर्षवर्धन पाटलांच्या लेकीनं स्टेटस ठेवलं; चंद्रकांत पाटलांनीही स्पष्टच सांगितलं
पुणे : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(political news) यांच्या पक्षाचा सहभाग झाल्यामुळे भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच गोची झाली आहे. कारण, महायुतीमधील नियमाप्रमाणे विद्यमान आमदाराची जागा त्या त्या पक्षाला सुटणार आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी निवडणुकांसाठीच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे.
त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची(political news) शक्यता मावळली असून त्यांनी तुतारी हाती घेण्याचं निश्चित केलंय. आता, पुढील 4 ते 5 दिवसांत हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आजच शरद पवारांची भेट घेतली असून त्यांच्या लेकीने स्टेटवर तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याचं दिसून आलं.
“आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा”, अशा आशयाचे बॅनर इंदापुरात काही दिवसांपूर्वीच झळकले आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावले असल्याची चर्चा आहे. यापूर्वी हर्षवर्धन पाटील दोन वेळेस विमान चिन्हावर अपक्ष निवडणूक लढले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुतारीच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली असून उद्याच पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या प्रवेशाची घोषणा करतील. दुसरीकडे त्यांची कन्या अंकिता यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे.
पुढील 4 दिवसांत हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील यांचा तुतारीत प्रवेश होणार असून भाजपनेही त्यांच्या या दाव्यावर स्पष्टपणे भूमिका मांडली. राजकारणात महत्वकांक्षा असतात, हर्षवर्धन पाटलांचं चुकीचं सुरू आहे असं मी म्हणणार नाही. पण माझं म्हणणं आहे की, एक पक्षात राहण्याचे समाधान वेगळं असतं, असे म्हणत एकप्रकारे चंद्रकांत पाटील यांनीही हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप सोडण्याचे संकेत दिले आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दत्तात्रय भरणे यांना त्यांच्याविरोधात मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. दत्तात्रय भरणे यांनी 114,960 मतं खेचून आणली होती. तर हर्षवर्धन पाटलांना 111,850 मतं पडली होती. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा 3,110 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांच्यामधील संघर्ष गेल्या 5 वर्षात वाढला आहे. इंदापूरमधील नेत्यांचे कार्यकर्ते मला त्रास देतात, अशा आशयाचे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते.
हेही वाचा :
अंकिता लोखंडे देणार गूड न्यूज? प्रेग्नेंट असल्याची चर्चा
‘या’ माजी खासदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
‘हिंदू समाज हा महामूर्ख’ संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य