उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा, झटपट बनवा साउथ इंडियन स्टाइल दही बुत्ती

उन्हाळा आला की, डिहायड्रेशनसोबतच आपल्याला पोटाचे विकारही(stomach doctor) सहन करावे लागतात. उष्णतेमुळे आपल्याला फारसे अन्न जात नाही तसेच ते पचत ही नाही. उन्हाळ्यात पोटाला गारवा मिळावा असं काहीतरी आपल्याला खावेसे वाटते.

या काळात आपल्याला शरीराला आणि पचनशक्ती(stomach doctor) सुरळीत ठेवण्यासाठी दही किंवा ताकाचा वापर करतो. दही हे पचायला हलके आहे. त्याचे सेवन केल्याने पोटाला आराम मिळतो. यात असणारे कॅल्शियम, प्रोटीन्स पचनक्रिया मजबूत करते. या उन्हाळ्यात तुम्ही आरोग्याला फायदेशीर ठरणारा साउथ इंडियन पद्धतीचा दही बुत्तीची रेसिपी ट्राय करु शकता.

साहित्य
तांदूळ १ कप

पाणी ३ कप

दही १.५ कप

दूध ३/४ – १ कप

एकदम बारीक चिरलेले आले १ इंच

बारीक चिरलेली हिरवी मिरची १-२

फोडणीसाठी

साजूक तूप / तेल २ tbsp

मोहरी १/२ tsp

उडीद डाळ १/२ tsp

लाल सुक्या मिरची ३-४

हिंग १/२ tsp

कढीपत्ता १०-१२

बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती
तांदूळ चांगले धुवा आणि १५ मिनिटे भिजवा. भिजल्यावर तांदूळातील जास्तीचे पाणी गाळून घ्या.

कढईत ३ कप पाणी गरम करा आणि उकळी आणा, पाणी उकळायला लागल्यावर मीठ घाला आणि चांगले मिसळा.

मंद आच ठेवा आणि त्यात भिजवलेले तांदूळ चांगले मिसळा. उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा, झाकून ठेवा आणि भात शिजवून घ्या.

भात शिजला की गॅस बंद करा. भात थंड झाल्यावर त्यात दही घालून चांगले मिक्स करा.

तडका साठी –
कढईत तूप गरम करा. त्यात मोहरी घाला आणि तडतडू द्या, नंतर उडीद डाळ घाला.

नंतर लाल मिरच्या, हिंग, कढीपत्ता घालून परतावे.

हा फोडणी दही भातामध्ये घाला आणि चांगले मिसळा. केरळी पापड, तळलेली मिराची सोबत सर्व्ह करा दही बुत्ती.

हेही वाचा :

धक्कादायक !शिक्षिकेच्या पतीने केला मुख्याध्यापकावर हल्ला,

दीपिका कक्कर पुन्हा प्रेग्नंट?, एका वर्षातच अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा

अजित पवार :‘सुर्य चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी बदलू शकत नहीं