‘गरिबांना पक्क घर देणार’; सभेत PM मोदींची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात मोदी(politics) हे महायुतीच्या सभेत उपस्थित असून यावेळी त्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी मोदींनी गरिबांसाठी आम्ही तीन कोटी नवीन घर बांधणीची सुरुवात केली असल्याचं सांगितलं.यामुळे महाराष्ट्रातील लाखो गरीबांच पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
निवडणुकीवेळी(politics) तुम्ही घराघरात जाल, लोकांना भेटालं. तुम्हाला कुठे जाताना एखाद कुटुंब झोपडीत राहताना दिसलं, तर त्याचे नाव, पत्ता लिहून मला पाठवा. त्यांना सांगा मोदींनी मला पाठवलय, तुला पक्क घर मिळेल. माझ्यासाठी तुम्हीच मोदी आहात. तुम्ही त्यांना शब्द द्या. मी पूर्ण करीन, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यात झालेल्या सभेत दिलं आहे.
“निवडणुकीच्या वेळी मी 70 वर्षावरील वृद्धांना मोफत उपचारांच आश्वासन दिलं होत. आमच्या सरकारने यासाठी योजना आणली आहे. त्याला मोठा प्रतिसाद देखील मिळतोय. 70 वर्षावरील वृद्धांना आयुषमान कार्ड मिळायला सुरुवातही झाली आहे.तुमच्या कुटुंबात कोणी 70 वर्षावरील व्यक्ती असेल तर चिंता करू नका. त्यांच्या उपचारासाठी त्यांचा हा मुलगा आहे.”, असं मोदी म्हणाले.
यावेळी त्यांनी कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीवरही निशाणा साधत हल्लाबोल केला. काँग्रेस आणि या आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्राची अनेक दशकापासूनची मागणी पूर्ण केली नाही, ती मागणी आम्ही पूर्ण केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. केंद्रात एनडीए सरकार तेजीत आहे. त्याच तेज गतीने महायुती सरकार पुन्हा महाराष्ट्रात पाहिजे, यासाठी तुमचा आशीर्वाद मागायला आलोय, असं नरेंद्र मोदी सभेत म्हणाले.
Unparalleled energy at the rally in Akola! Maharashtra stands firmly with the NDA.https://t.co/DjfwmpORDQ
— Narendra Modi (@narendramodi) November 9, 2024
यावेळी राम मंदीराचा देखील त्यांनी उल्लेख केला. “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज 9 नोव्हेंबररोजीच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबद्दल निर्णय दिला होता. राष्ट्र प्रथम ही भावना देशाची मोठी ताकद आहे. 2014 ते 2024 ही 10 वर्षे महाराष्ट्राने भाजपाला आशीर्वाद दिलाय. यामुळे माझ्यासाठी महाराष्ट्राच्या सेवेच सुखच वेगळं आहे. महाराष्ट्राशी संबंधित वाढवण बंदराचा खर्च 80 हजार कोटी रुपये आहे. महाराष्ट्रातलं हे बंदर भारतातील सर्वात मोठ बंदर असेल”, असं मोदी यांनी सांगितलं.
हेही वाचा :
UPSC CBI असिस्टंट प्रोग्रामरच्या पदासाठी भरतीची प्रक्रिया आयोजित
गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी?
अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले!