सोन्यात तुफान, चांदीचे तळ्यातमळ्यात, आता किंमती काय?

सोन्याने या आठवड्यात जोरदार मुसंडी मारली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (prices)हे अमेरिकेच्या अस्थायी नागरिकत्वासाठी गोल्ड कार्ड वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची भीती वाढली आहे. गेल्या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीलाचा दोन दिवसात सोन्याने वसुली केली. किंमती 1200 रुपयांहून अधिकने वाढल्या. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या

सोने 1300 रुपयांनी वधारले
या आठवड्यात सोन्याचा आलेख उंचावला. Donald Trump यांच्या धोरणाच्या भीतीने मौल्यवान धातुची किंमत वधारली. सोमवारी सोने 760 रुपयांनी तर मंगळवारी 600 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.गेल्या आठवड्यात चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. तर या सोमवारी चांदी 1,000 रुपयांनी वधारली. तर मंगळवारी किंमतीत(prices) बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,300, 23 कॅरेट 85,954, 22 कॅरेट सोने 79,051 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,725 रुपये, 14 कॅरेट सोने 50,486 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,993 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत(prices) दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
हेही वाचा :
चालय काय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार महाराष्ट्र घटनेनं हादरल
संतोष देशमुखांचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या कुटुंबीयांना मोठा धक्का
‘या’ 3 तारखेला जन्मलेले लोक असतात भांडखोर; मात्र जोडीदाराची घेतात काळजी