होळीनंतर ‘या’ राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; उत्साहाचे वारे वाहणार, हातात पैसा खेळणार

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी ठराविक कालावधीने एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. शनी देव होळीनंतर म्हणजेच 29 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांचे सोन्याचे दिवस सुरु होतील. शनीच्या राशी(horoscope) संक्रमणाचा नेमका कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे. ते जाणून घेऊयात.

वृषभ रास
वृषभ राशीच्या(horoscope) लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, कामासाठी तुम्हाला कोणापुढेही हात पसरावे लागणार नाहीत. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तसेच, तुमच्या व्यवसायाचा देखील चांगला विस्तार वाढलेला दिसेल. बेरोजगारांना लवकरच चांगल्या नोकरीची संधी मिळेल. त्यामुळे तेदेखील या काळात खुश असतील. मित्रांचं सहकार्य तुम्हाला चांगलं मिळेल.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. तुम्ही पार्टनरशिपमध्ये चांगला व्यवसाय करु शकता. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क असण्याची गरज आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगला प्रतिसाद पाहायला मिळेल. या काळात तुम्ही मानसिक शांततेवरही भर देणं गरजेचं आहे. यामुळे तुमची चिडचिड होणार नाही आणि कामावर पूर्ण लक्ष केंद्रित राहील.

मकर रास
मकर राशीच्या(rashi) लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज शनीदेवाची तुमच्यावर चांगली कृपा असेल. त्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तसेच, तुम्ही हाती घेतलेलं काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगला बदल झालेला पाहायला मिळेल. जे विवाहित लोक आहेत त्यांचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. या काळात तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन योजना राबावू शकता. तुमच्या कामाचं कौतुकच केलं जाणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बनतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर!
जीबीएसचा धोका वाढला! या गोष्टींवर आणणार निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंड हवी’; प्रसिद्ध अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य