गुड न्यूज! राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 4000 रुपये

शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. आत्तापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 18 वा हप्ता कधी मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी(good news) समोर आली आहे.

आतापर्यंत सरकारने 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता 18 व्या हप्त्याची प्रतिक्षा देखील संपली आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना आज 5 ऑक्टोबरला दिली जाणार आहे(good news).

शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे 2000 रुपये आज मिळणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 रुपये देखील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आज देशभरातील शेतकऱ्यांना 2 हजार रुपये तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे असे एकूण 4000 रुपये मिळणार आहेत.

केंद्र सरकारने 2019 च्या निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. तर, महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली होती. याच्या 4 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. आज राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारच्या ‘पी. एम. किसान’ योजनेचा 18 वा हप्ता आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’च्या पाचव्या हप्त्याची रक्कम मिळेल.

महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या वितरणाचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. जवळपास राज्यातील 91.53 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन्ही योजनेचे एकूण 4 हजार रुपये आज जमा होतील.

दरम्यान, पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास शेतकऱ्यांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. ई केवायसी केली नाही तर खात्यात पैसे जमा होणार नाहीत.

हेही वाचा :

सूर्यकुमार की शिवम? रोहित शर्माचा रेकॉर्ड कोण मोडणार?

बेकरीतील केकमुळे कॅन्सरचा धोका; महाराष्ट्र सरकारने दिला गंभीर इशारा

गौतमी पाटीलपेक्षा दुसरा चांगला पर्याय महाराष्ट्रात नाही – मराठी अभिनेत्याच्या वक्तव्याने रंगली चर्चा