खुशखबर! अक्षर पटेल लवकरच होणार बाबा, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

सध्या भारताचा संघ बांग्लादेशविरुद्ध T२० मालिका(cricketer) खेळत आहे. यामध्ये टीम इंडियाने पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवून १-० अशी आघाडी मालिकेमध्ये केले आहे. विश्वचषक विजेत्या संघातील काही खेळाडू हे द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये आले होते. यावेळी कपिल शर्माने अक्षर पटेलची फिरकी घेतली होती.

यावेळी कपिल अक्षर म्हणाला होता की तुम्ही जेव्हा माझ्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा आले होते तेव्हा तुम्ही सिंगल होता, आता तुम्ही दुसऱ्यांदा आले आहेत तेव्हा तुमचं लग्न झाले आहे. आता जेव्हा तुम्ही आमच्या शोमध्ये याल तेव्हा आम्हाला छोटा अक्षर पटेल पाहायला मिळेल का? यावर अक्षर पटेलने(cricketer) उत्तर दिले होते की, लवकर तसही होऊ शकत. आता ही बातमी खरी झालेली आहे.

भारताचा स्टार अष्टपैलू आणि विश्वचषक विजेता अक्षर पटेल लवकरच बाबा होणार आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे यामध्ये त्याने त्यांची पत्नी मेहा पटेल ही प्रेग्नेंट आहे याबाबत याने चाहत्यांना बातमी दिली आहे. खेळाडूने सोमवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की, त्याची पत्नी मेहा गर्भवती आहे आणि दोघेही लवकरच पालक होणार आहेत.

अक्षरने पत्नीसोबत फोटोशूटही केले आहे. त्याने बेबी शॉवरचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी दोघांचेही कुटुंबीय उपस्थित होते. व्हिडिओसोबत अक्षरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “खूप आनंद येणार आहे.”

अक्षर नुकताच द कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये त्याने लवकरच आपल्या घरी आनंदाची बातमी येणार असल्याचे संकेत दिले होते. अक्षर शोमध्ये म्हणाला होता, “असं होऊ शकतं. मी आधी म्हटलं होतं की माझी आवडती हिरोईन दीपिका पदुकोण आहे. तिच्यासोबत काहीतरी चांगलं घडलं आहे, त्यामुळे आमच्यासोबतही काहीतरी चांगलं घडण्याची शक्यता आहे.”

हेही वाचा :

भारतात पेट्रोल अन् डिझेलच्या किंमती कमी होणार?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची गरजू महिलांसाठी मोठी घोषणा!

“बेबी सिंबाचा डेब्यू चित्रपट…” रणवीर-दीपिकाच्या लेकीने जन्माआधीच केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण