आनंदाची बातमी! टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर लवकरच कमी होणार
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2024/07/image-320.png)
सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले (Good news)टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर आता लवकरच कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून गृहिणींचं कोलमडलेलं महिन्याचं बजेट देखील सुरळित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांचा पुरवठा विस्कळीत झाला होता.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2024/07/image-203-1024x819.png)
राज्यात सर्वच ठिकाणी मुसळधार(Good news) पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कांदा, टोमॅटो, बटाटा यासांरख्या भाजीपाल्याचं उत्पादन घटलं आहे. उत्पादन घटल्यामुळे परिणामी पुरवठा देखील कमी झाला आहे. पुरवठा कमी आणि वाढत्या मागणीमुळे भाजीपाल्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र आता लवकरच टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
सध्या प्रति किलो टोमॅटोची किंमत दिल्लीत 70 ते 80 रुपये, मुंबईत 80 ते 90 रुपये आणि कोलकात्यात 80 ते 90 रुपये आहे. पुरवठा घटल्यामुळे टोमॅटोच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. मात्र आता लवकरच पुरवठा सुरळित होऊन टोमॅटोचे दर कमी होतील, अशी आशा सरकारने व्यक्त केली आहे. दिल्लीत टोमॅटो हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून येत आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून हायब्रीड टोमॅटोची आवक होताच टोमॅटोचे भाव कमी होऊ लागतील .
मुंबईत प्रतिकिलो कांद्यासाठी ग्राहकांना 40 ते 50 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच प्रतिकिलो बटाट्याची किंमत 40 ते 45 रुपये आहे. कांदा, टोमॅटो, बटाटा यासोबतच इतर भाज्यांच्या किंमतीत देखील वाढ होत आहे. हिरवी मिरची 160 रुपये किलो, कोथिंबीर 300 रुपये किलो, बीन्स 200 रुपये प्रति किलो, कोबी 160 रुपये किलो, आलं 280 रुपये किलो, लसूण 280 रुपये किलो झाली आहे.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2024/07/image-292.png)
पावसाळ्यापूर्वी टोमॅटो 35 ते 40 रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. मात्र आता टोमॅटोची किंमत 80 ते 90 रुपये प्रतिकिलो झाली आहे. टोमॅटोसह इतर भाज्यांच्या किंमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भाजीपाल्यांसह डाळी आणि फळांच्या किंमतींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हवामान बदलाचा परिणाम भाजीपाल्यावर होत आहे.
सर्वच भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. तर शेतकऱ्यांना दरवाढीचा चांगलाच फायदा होत आहे. वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसत आहे. तसेच गृहिणींचे महिन्याचे बजेट देखील कोलमडत आहे. मात्र आता लवकरच सगळ्यांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा :
महिलेच्या अंगावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न !
रविवारी ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस; IMD कडून रेड अलर्ट जाहीर
…तर आमदारकीची निवडणूक लढवणार नाही; बच्चू कडूंनी घेतला मोठा निर्णय