शेतकऱ्यांना गुडन्यूज! शेततळे, विहीर बांधकामासाठी माती अन् खडीवरील रॉयल्टी माफ; सरकारचा निर्णय

राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकरी(farmers) आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. घरकूल लाभार्थी आणि शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी, शेततळे तयार करण्यासाठी किंवा शेत पाणंद रस्ता तयार करण्यासाठी माती आणि खडीची गरज असते. यासाठी पैसेही खर्च करावे लागतात. परंतु, आता हीच माती आणि खडी म्हणजेच गौण खनिज रॉयल्टी फ्री मिळणार आहे. महसूल विभागाने याबाबत निर्णय घेतला असून शासन निर्णय जारी केला आहे.

राज्यात गावतळी, पाझरतलाव, बंधाऱ्यातील गाळ आणि माती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरली तर त्यांना रॉयल्टी आणि अर्जफ फी आकारू नये. शेतकऱ्यांना स्वखर्चाने गाळ, माती घेऊन जाण्यास परवानगी द्यावी असे शासन निर्णयात म्हटले आहे. महामार्गांएवढेच शेत पाणंद रस्ते सुद्धा महत्वाचे आहेत. त्यामुळे पाणंद रस्ते तयार करण्यावर सरकारचा भर आहे. यासाठी शेतकऱ्यांना(farmers) मदतही केली जाते. आता सरकारने निर्णय घेत शेतकऱ्यांचे काम आणखी सोपे केले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही योजनेतून गावतळी, शेततळी, शेतविहीरी, पाझरतलाव, गावनाले, महसुली नाले, बंधारे बांधकाम, मामा तलाव, लघुसिंचन तलावांचे खोलाकरण, सरळीकरण तसेच पूरहानी थांबवण्यासाठी करण्यात येणाऱ्या खोलीकरण योजनेंतर्गत निघणारी माती, दगड, मुरुम, मातीयुक्त रेती या गौण खनिजांना शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
हेही वाचा :
भारताच्या शत्रू देशाबाबत बाबा वेंगा यांचं सर्वात मोठं भाकीत समोर
अंगावर काटा आणणारा ‘छोरी २’ चा भयानक ट्रेलर प्रदर्शित
Sikandar ला सपोर्ट मिळत नसल्याने सलमान खान भावूक, म्हणाला