शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. निवडणुका आता तोंडावर आल्याने सर्वत्र प्रचारसभा रंगताना दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांची धुळ्यात जाहीर सभा सध्या सुरू आहे. पहिल्याच सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. याच सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना(farmers) मोठा शब्द दिला आहे.

“तुमच्या आशिर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याशिवाय MSP पेक्षा भाव कमी झाल्यास भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांच्या(farmers) खात्यात थेट पैसे जमा होतील”,असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

“मोदींच्या नेतृत्वाखाली मनमाड-इंदूर रेल्वेसेवेच्या माध्यमातून एक अशा प्रकारचं सेंटर धुळ्यात तयार होतेय. मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर, धुळे-मनमाड रेल्वे या सगळ्याचा एकत्रित विचार केला, तर इंडस्ट्रीज लॉजिस्टिक सेंटर कुठलं असेल, तर धुळे जिल्हा असेल. मोदींनी सहा राष्ट्रीय महामार्ग धुळ्याला दिले”, असंही फडणवीस म्हणाले.

“धुळे जिल्हा 100 टक्के रिझल्ट देणार. पाचही जागा महायुतीच्या निवडून येणार. मुलींना मोफत शिक्षण, मोदींच्या नेतृत्वाखाली लखपती दीदी या योजना राज्यात सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात 8 हजार रुपये पीक विम्याची योजना सुरु आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करुन सरकारने शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्ती केली. पुढच्या पाचवर्षांसाठी वीज बिलातून मुक्ती सरकारने दिलीय.”, असं सभेत फडणवीस यांनी सांगितलं.

पुढे त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन महाराष्ट्र पुढे नेतोय. आमच्या विकासाला उत्तर देता येत नाही, म्हणून आमच्या विरोधकांनी रणनिती आखली आहे. धुळ्यात ते वोट जिहाद करतायत. लोकसभेला मालेगाव सेंट्रल आणि धुळ्यातील वोट जिहादमुळे चार हजार मतांनी पराभव झाला.आता जागे झालो नाही, तर नेहमीसाठी झोपावं लागेल.”, असं म्हणत फडणवीस यांनी वोट जिहादबाबत मोठं भाष्य केलं.

हेही वाचा :

फॉर्म भरुनही पैसे आले नाही त्यांच्यासाठी मोठी अपडेट समोर!

मुख्यमंत्र्यांचं शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची टीका

गरिब विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची चिंता मिटली; केंद्र सरकारकडून ‘विद्यालक्ष्मी योजना जाहीर