गणेशभक्तांसाठी खुशखबर! गावी जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफीचा निर्णय
गणेशोत्सवासाठी गावी म्हणजे कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (news)यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सवापूर्वी गणरायाच्या आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक कोकणात(news) येत असतात. तसेच आपल्या गावी जातात. राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील सरकारतर्फे करण्यात आले आहे. आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. झाडाच्या फांद्यांची छाटणी करावी, कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मोठी गणेश मंडळे असतील तिथे आरोग्य पथके, रुग्णवाहिका, अग्निशमन दल वाहनाची सोय करण्याची आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गणेशोत्सवाच्या वेळेस प्रशासनाने आवश्यक ती कामे तातडीने करण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. प्रशासनाला दिलेल्या आदेशाची अंमलबाजवणी झाल्यास किंवा कामामध्ये हयगय करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
दरम्यान, मोठी गणेश मांडले असतील त्यासाठी आवश्यक त्या सुरक्षेच्या व इतर उपाययोजना कराव्यात. महापालिकांनी गणेश मंडळाच्या इथे उभे असलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनासाठी कोणतेही शुल्क आकारू नये असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच गणेशोत्सव देखील आनंदात साजरा व्हावा यासाठी सरकार उपाययोजना करताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
स्वातंत्र्यदिनाच्या विशेष नाश्त्यासाठी पौष्टिक मूगडाळ पराठा – एक अनोखी रेसिपी
किशोर कुमारांचा चिन टपाक डम डम’ गाण्याचा मूळ आवाज इंटरनेटच्या जन्माआधीच सापडला; व्हिडिओ व्हायरल