वर्षाच्या शेवटी सोन्याची आनंदवार्ता, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव
024 या वर्षातील हा शेवटचा महिना सुरू आहे. आणखी 10 दिवसांनी हे वर्ष (gold price)संपेल. 2024 या वर्षात मौल्यवान धातू सोन्याने ग्राहकांचा खिसा बराच रिकामा केला. या वर्षात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी दरवाढीचे अनेक रेकॉर्ड बनवले आणि तोडले. आता वर्षाच्या शेवटच्या काही दिवसात सोने खाली उतरताना दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना काही अंशी तरी दिलासा मिळाला आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला दोन्ही धातुला मोठी आघाडी घेता आली नाही. सध्या लग्न सराईचा देखील हंगाम सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांची पावलं पुन्हा सराफा बाजाराकडे वळाली आहेत.
या आठवड्यात सोने मंगळवारी 110 रुपयांनी वधारले तर बुधवारी त्यात 160 रुपयांची घसरण दिसली. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,990 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.तर, मागच्या आठवड्यात चांदीत तब्बल 5 हजारांची घसरण झाली होती. या आठवड्यात गुडरिटर्न्सनुसार चांदीच्या किंमतीत(gold price) कोणताही बदल झालेला नाही. सध्या एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये इतका आहे. म्हणजेच या आठवड्यात चांदीच्या किमती स्थिर राहिल्या.
बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,658, 23 कॅरेट 76,351, 22 कॅरेट सोने 70,219 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,494 रुपये, 14 कॅरेट सोने 44,845 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. (gold price) 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.
हेही वाचा :
सोन्याच्या दरात आज पुन्हा झाली घट; काय आहेत 22,24,18 कॅरेटचे भाव, जाणून घ्या
राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी
एकनाथ शिंदेंकडे गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ; देवेंद्र फडणवीसांकडे कोणतं खातं?