भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (traveling)यानुसार आता लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधील स्लीपर कोचमध्ये एसी कोचप्रमाणे लिक्विड हँड वॉशची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यापूर्वी ही सुविधा फक्त एसी कोचमध्ये मर्यादित होती.रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, ऑन बोर्ड हाउसकीपिंग सेवा असलेल्या सर्व नॉन-एसी स्लीपर आरक्षित डब्यांमध्ये ही सुविधा लागू होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक स्वच्छ आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.
रेल्वेने घेतलेल्या निर्णयानुसार, स्लीपर कोचच्या शौचालयाजवळील वॉश बेसिनजवळ लिक्विड सोप डिस्पेंसर बसवले जाणार आहेत. ट्रेन सुरु होण्यापूर्वी यामध्ये लिक्विड हँड वॉश भरला जाईल, आणि रस्त्यातील तपासणीनंतर गरज पडल्यास त्याची पुनर्भरणाही केली जाईल.(traveling)या सुविधेमुळे स्वच्छतेचे मापदंड उंचावले जातील, तसेच प्रवाशांमध्ये कोविड पश्चात काळात वाढलेली स्वच्छतेची जागरूकता लक्षात घेता, ही सुविधा आवश्यक बनली आहे. रेल्वेने सर्व विभागीय कार्यालयांना OBHS असलेल्या ट्रेनमध्ये ही सुविधा तत्काळ सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.
देशातील राजधानी, शताब्दी, वंदे भारत, तेजस एक्सप्रेससारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये आधीच अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मात्र OBHS सेवा फक्त मोजक्याच सुपरफास्ट व मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्येच आहे. रेल्वे बोर्डाने आता या OBHS सेवा असलेल्या मेल व एक्सप्रेस ट्रेनना स्लीपर कोचमध्येही विशेष सुविधा देण्यास सुरूवात केली आहे.(traveling)या निर्णयामुळे लाखो नॉन-एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार असून, स्वच्छतेकडे रेल्वे अधिक गांभीर्याने बघत आहे, हेही अधोरेखित होते. हा निर्णय प्रवासी अनुभव सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
हेही वाचा :