‘छावा’ चित्रपट बघणाऱ्यांसाठी गुड न्यूज; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

‘छावा’ या चित्रपटाच्या(movie) माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा जगभरात पोहोचवली जात आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

चित्रपटाचा(movie) ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे पहिल्या शोपासूनच चित्रपटगृहांमध्ये गर्दी झाली होती. आता चित्रपट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य प्रदेशात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील प्रेक्षकांना ‘छावा’च्या तिकिटासाठी कमी पैसे द्यावे लागतील.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ‘छावा’ चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बनलेल्या ‘छावा’ या चित्रपटाला मी टॅक्स फ्री करण्याची घोषणा करतो,” असे ते म्हणाले.
याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, “मला आनंद आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर अत्यंत चांगला चित्रपट बनवला गेला आहे. मी अजून हा चित्रपट पाहिला नाही, मात्र मी लोकांकडून ऐकलंय की इतिहासाशी छेडछाड न करता हा चित्रपट बनवला गेला आहे.

या चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी काय करू शकतो, याबद्दल आम्ही विचार करू.” तसेच, महाराष्ट्रात २०१७ पूर्वीच मनोरंजन कर हटवल्याचेही त्यांनी सांगितले.
‘छावा’ चित्रपटाने गेल्या सहा दिवसांत १९७.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे आणि लवकरच तो २०० कोटींचा टप्पा पार करेल. ‘छावा’ चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
हेही वाचा :
लोकलमध्ये धक्का लागल्याने वाद! धावत्या लोकलमध्ये प्रवाशांवर चाकू हल्ला, तीन प्रवासी जखमी
महापालिका निवडणुकीपूर्वीच ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश; ठाकरे गटाला बसणार धक्का
महाशिवरात्रीला उपवासात ‘हे’ आहार तुम्हाला दिवसभर ठेवतील ताजेतवाने, जाणवणार नाही थकवा