नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी!

नोकरीच्या(jobs) शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! BPNL ने २०२५ साठी विविध पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण २,१५२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार १२ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.

BPNL च्या या भरतीमध्ये(jobs)पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी, पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक आणि पशुधन फार्म ऑपरेशन सहाय्यक या पदांचा समावेश आहे. पशुधन फार्म गुंतवणूक अधिकाऱ्यासाठी ३६२ जागा, पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यकासाठी १,४२८ जागा आणि पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंटसाठी ३६२ जागा उपलब्ध आहेत. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 आहे.

पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे, आणि या पदासाठी ३८,२०० रुपये प्रति महिना वेतन मिळेल. पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक पदासाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा, या पदासाठी ३०,५०० रुपये प्रति महिना वेतन मिळेल.

पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट पदासाठी १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात, आणि या पदासाठी २०,००० रुपये प्रति महिना वेतन निश्चित करण्यात आले आहे.

उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि एकदिवसीय प्रशिक्षण सत्राद्वारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत प्रत्येकी ५० गुणांची असेल. दोन्ही टप्प्यांमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

सांगली ‘कोयताकांड’ने हादरली, नवऱ्याने गळ्यावर कोयत्याने वार करत बायकोला संपवलं

तरुणी धावत्या ट्रेनला लटकून बनवत होती रिल इतक्यात… Video Viral

‘उद्धव ठाकरे हा तर टक्कापुरुष’; ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंवर टीका