केंद्राकडून महाराष्ट्राला गुड न्यूज…
मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक आनंदाची बातमी(Good news) दिली आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया किशोर रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर या यापूर्वी 2016 ते 2021 या कालावधीत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्यांची सामाजिक कार्यातील भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही कामगिरी करणाऱ्या विजया रहाटकर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत.
महाराष्ट्रातील(Good news) मुळच्या संभाजीनगरच्या रहिवासी असलेल्या विजया रहाटकर यापूर्वी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि राजस्थानमधील भाजपच्या सहप्रभारी होत्या. अशा स्थितीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि राजस्थानमधील सात जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी त्यांना ही मोठी जबाबदारी देऊन भाजप महिलांना योग्य सन्मान देत असल्याचा संदेश मतदारांना देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मानले जात आहे.
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, रहाटकर यांची या पदावर तीन वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षापर्यंत (जे आधीचे असेल) नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आयोगाच्या नवव्या अध्यक्षा असतील. महाराष्ट्र महिला आयोगाच्या कार्यकाळात, त्यांनी सक्का (ॲसिड हल्ल्यातील पीडितांना मदत करण्यासाठी), प्रज्ज्वला (केंद्र सरकारच्या योजनांशी स्वयं-मदत गट जोडण्यासाठी) आणि सुहिता (महिलांसाठी 24×7 हेल्पलाइन सेवा) यासारख्या कल्याणकारी योजनांची स्थापना केली सुरु केले.
याशिवाय, त्यांनी POCSO कायदा, तिहेरी तलाकविरोधी सेल आणि मानवी तस्करीविरोधी युनिटवर लक्ष केंद्रित करून कायदेशीर सुधारणांवरही काम केले. विजया रहाटकर यांनी डिजिटल साक्षरता कार्यक्रम सुरू केला आणि महिलांच्या समस्यांना वाहिलेले ‘साद’ नावाचे प्रकाशनही सुरू केले. महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय कायदा पुरस्कार आणि राष्ट्रीय साहित्य परिषदेच्या सावित्रीबाई फुले पुरस्काराचा समावेश आहे.
हेही वाचा :
शनीच्या मार्गी चालीने ‘या’ 4 राशींचं भाग्य उजळणार
विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘नवी मशाल’
रेमो डिसोझा आणि त्याच्या पत्नीवर 119600000 रुपये फसवणुकीचा आरोप