एप्रिलच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज; सरकारच्या तिजोरीत जमा झाले इतके कोटी

एप्रिलच्या पहिल्या दिवशी जीएसटी संकलनाचे मोठे आकडे समोर आले आहेत. मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1.78 लाख कोटी रुपये होते. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी त्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

डिसेंबरमध्ये सरकारच्या तिजोरीत १.६४ लाख कोटी रुपयांचा जमा झाला आहे. वार्षिक आकडेवारी पाहता जीएसटी संकलनात १० टक्के वाढ झाली आहे. सोमवारी अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली. मागील वर्षी याच कालखंडात १.४९ लाख कोटी इतके जीएसटी संकलन झाले होते. विशेष म्हणजे मागील सलग सात महिने जीएसटी संकलन १.६० लाख कोटी रुपयांहून अधिक राहिले आहे.

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच सरकारी तिजोरीशी संबंधित आनंदाची बातमी आली आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी जीएसटी संकलनाचे मोठे आकडे समोर आले आहेत. मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1.78 लाख कोटी रुपये होते. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये त्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मासिक आधारावर विचार केला तर आतापर्यंतची ही दुसरी मोठी आकडेवारी आहे. 23-24 या आर्थिक वर्षात 20.14 लाख कोटी रुपये GST संकलन झालं आहे, जे 22-23 च्या तुलनेत 11.7 टक्के अधिक आहे.