गुगलची भारतावर नजर! विस्तारासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मुंबई : जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन गुगलने(google) एका नव्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून गुगल भारतात विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. याआधी गुगलने जिओमध्ये गुंतवणूक केली होती. त्यानंतर गुगलने पिक्सेल फोनची भारतात विक्री व्हावी म्हणून फॉक्सकॉनशीही चर्चा चालू आहे. आता हीच कंपनी ई- कॉमर्स क्षेत्रात सर्वांत प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्लिपकार्ट या कंपनीतही गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
फ्लिपकार्ट ही कंपनी वॉलमार्ट या कंपनीची(google) उपकंपनी आहे. याच फ्लिपकार्ट कंपनीचा काही हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव गुगलने ठेवला आहे. छोटी हिस्सेदारी खरेदी करून जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न गुगलकडून केला जातोय. हा करार पूर्णत्त्वास गेल्यास गुगुल प्रतिस्पर्धक Amazon ला टक्कर देणार आहे.
वॉलमार्टची मालकी असलेल्या गुगलच्या या प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. गुगल फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करू पाहतेय. ही गुंतवणूक साधारण 35 कोटी डॉलर्स म्हणजेच 2,900 कोटी रुपयांची असू शकते. ही सर्व चर्चा फक्त प्राथमिक स्तरावरच आहे. लवकरच यावर ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
गुगलच्या गुंतवणुकीनंतर फ्लिपकार्टला नेमकं काय मिळणार? असे विचारले जात आहे. पण गुगलने ही गुंतवणूक केल्यास फ्लिपकार्टला क्लाऊट प्रोग्रॅमच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवता येईल. तसेच या कंपनीला भारतातील संपूर्ण ग्राहकांना सेवा देण्यासाठी डिजिटल इन्फ्रा स्ट्रक्चरला मजबूत करता येईल. दरम्यान, गुगल फ्लिपकार्टमध्ये नेमके किती रुपये गुंतवणार हे अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत खुद्द फ्लिपकार्ट किंव गुगलने अधिकृत माहिती दिलेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार गुंतवणुकीचा हा आकडा 35 कोटी डॉलर्स असण्याची शक्यता.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार या गुंतवणुकीदरम्यान फ्लिपकार्ट या कंपनीचे बाजार भांडवल जवळपास 35 अब्ज डॉलर्स ठरवले जाण्याची शक्यता आहे. कारण वॉलमार्टने 31 जानेवारी 2024 रोजी सांगितल्यानुसार फ्लिपकार्ट या कंपनीचे बाजार भांडवल जवळपास 35 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. वॉलमार्टने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 3.5 अब्ज डॉलर्स देऊन फ्लिपकार्टमध्य दहा टक्के हिस्सेदारी वाढवली होती. आता फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्ट या कंपनीची साधारण 85 टक्के हिस्सेदारी आहे.
हेही वाचा :
५ मिनिटांत तयार होणारा हा नाश्ता तुम्ही कधीच खाल्ला नसेल
श्वेता तिवारी तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? अभिनेत्री म्हणाली, ‘मला लग्न करायचं…’
येत्या ४८ तासांत रेमल चक्रीवादळ धडकणार, ‘या’ राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळणार