नागपूर : सरकारी नोकरीच्या(job ) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी समोर आली आहे. नागपूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागात अग्निशामक विमोचक पदासाठी १०० रिक्त जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे.
महत्वाची माहिती :
पदाचे नाव: अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer)
एकूण जागा: 100
शैक्षणिक पात्रता:
किमान १०वी उत्तीर्ण
महाराष्ट्र शासनाच्या ६ महिन्यांच्या अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा
महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळाचा १ वर्षाचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम
नोकरीचे ठिकाण:
नागपूर महानगरपालिका हद्द
भरतीचा कालावधी:
फक्त ४ महिन्यांसाठी करारावर ही भरती(job ) केली जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
१९ जून २०२५
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
मुख्य अग्निशमन अधिकारी कार्यालय,
छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन,
तळ मजला, महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स,
नागपूर – ४४०००१
अधिक माहिती व अर्जाचा नमुना:
महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सरकारी नोकरीची(job ) वाट पाहणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. केवळ काही दिवसच अर्जासाठी शिल्लक आहेत, त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावा.
आपत्कालीन सेवा क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्यांसाठी ही भरती विशेष आहे!
हेही वाचा :