भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. कंपनीने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि असोसिएट एक्झिक्युटिव्हसह अनेक पदांसाठी भरती(jobs ) जाहीर केली आहे. या भरतीतील खास गोष्ट म्हणजे विविध क्षेत्रात शिक्षण घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
इच्छुक उमेदवार BPCL bharatpetroleum.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. सध्या अनेकांना नक्की कुठे नोकरी करायची आणि कसा अर्ज करायचा याबाबत माहिती करून देण्यासाठी आपण हा लेख लिहिला आहे.
कोण अर्ज करू शकते?
- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी): मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल किंवा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात
- असोसिएट एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी): बी.टेक, बीई किंवा बीएससी (अभियांत्रिकी) करणारे तरुण या पदासाठी पात्र आहेत
- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अकाउंट्स): पदवीसह इंटर सीए किंवा इंटर सीएमए आवश्यक आहे
- असोसिएट एक्झिक्युटिव्ह (गुणवत्ता हमी): एमएससी (रसायनशास्त्र) मध्ये पदवी असणे आवश्यक आहे, ते देखील सेंद्रिय, अजैविक, भौतिक किंवा विश्लेषणात्मक रसायनशास्त्रात
- सचिव: दहावी आणि बारावी उत्तीर्ण होण्यासोबतच पदवी देखील आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती आहे?
या पदांसाठी किमान वय ३० वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे आहे. तथापि, ओबीसी, एससी/एसटी उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही जर या वयोगटामध्ये व्यवस्थित फिट असाल तर त्वरीत या भरघोस पगाराच्या नोकरीसाठी(jobs ) तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी नक्की किती पगार असेल याबाबत आपण अधिक माहिती घेऊया.
किती पगार दिला जाईल?
- ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी मासिक वेतन ३०,००० ते १,२०,००० आहे (वार्षिक पॅकेज अंदाजे ११.८६ लाख)
- असोसिएट एक्झिक्युटिव्ह: मासिक ४०,००० ते १,४०,००० (वार्षिक पॅकेज अंदाजे १६.६४ लाख)
निवड कशी केली जाईल?
सर्वप्रथम, पात्रता आणि अनुभवाच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केले जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर केस-आधारित चर्चा, गट कार्य आणि मुलाखतीद्वारे अंतिम निवड केली जाईल. ही निवड संपूर्णतः भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्याद्वारेच असणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र अर्ज करण्यासाठी शुल्क असेल
अर्ज शुल्क
सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी: १००० + १८० (जीएसटी). एससी, एसटी, PWBD साठी कोणतेही शुल्क नाही.
अर्ज कसा करायचा?
- BPCL ची वेबसाइट bharatpetroleum.in ला भेट द्या
- होमपेजवर दिलेल्या “BPCL भरती २०२५” लिंकवर क्लिक करा
- अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा
- भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंटआउट घ्या
कोणत्याही पद्धतीने तुम्ही अर्ज करताना चुकू नका. इथे आम्ही या लेखातून तुम्हाला योग्य आणि स्टेप बाय स्टेप माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या पद्धतीने अर्ज करून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी तरतूद करण्यासाठी पहिले पाऊल उचलू शकता. मोठ्या पगाराची नोकरी(jobs ) तुम्हीही मिळवू शकता. या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही जर सर्व बाबतीत व्यवस्थित फिट असाल तर त्वरीत अर्ज करायला घ्या!
हेही वाचा :