एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा ‘या’ प्लॅन ठरणार फायद्याचा; आता वैद्यकीय सेवेसाठी…

मुंबई : सर्वसामान्यांच्या हक्काची अशी ओळख असलेल्या लालपरीच्या ताफ्यात आता आणखी 2640 बसगाड्या येणार आहेत. महाराष्ट्राच्या रस्त्यांवर नवीन लाल परी दिसतील. कारण यावर्षी एसटीच्या(ST) ताफ्यात 2640 नवीन बसेस घेतल्या जाणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी नवीन बसेसबाबत घोषणा केली.

मंत्री सरनाईक यांनी विविध महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्यांनी म्हटले की, ‘राज्यातील वाहतूक सेवांचे एकूण चित्र बदलण्यासाठी आम्ही एक मास्टर प्लॅन तयार करत आहोत, ज्यामध्ये स्वच्छता आणि सुरक्षित प्रवासाला महत्त्व दिले जाईल आणि एसटीचे आधुनिकीकरण टप्प्याटप्प्याने सुरू केले जाईल, असे ते म्हणाले.

तथापि, पहिला फायदा एसटी(ST) कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे. त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक सुविधांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे, त्यांच्या गणवेशापासून ते त्यांच्या शौचालये आणि विश्रांतीगृहांपर्यंत. जर त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या तर प्रवाशांनाही चांगल्या सुविधा मिळतील.

यावेळी सरनाईक यांनी 17 नवीन बसेसचे उद्घाटन केले आणि सांगितले की, जानेवारी अखेरीस 150 लालपरी बसेस येतील आणि त्या ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण भागातील डेपोंना दिल्या जातील. त्यानंतर दरमहा 300 एसटी बस येतील आणि राज्यभरातील सर्व डेपोंना या बसेस मिळतील.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी बोरिवलीमध्ये 100 खाटांचा आधुनिक दवाखाना देखील बांधला जाईल, जिथे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल अशी व्यवस्था केली जाईल, असेही परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले.

एसटी महामंडळाने दिव्यांगांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजना आणि पास सवलत योजना सुरू केल्यानंतर एसटी बसेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अमरावती विभागात 1 एप्रिल ते 30 डिसेंबर 2024 या नऊ महिन्यांत सुमारे 176 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे, अशी माहिती देण्यात आली.

हेही वाचा :

धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार? विचारताच अजित पवार भडकले

प्रसिद्ध संगीतकार गायक राहुल घोरपडे यांचं निधन; कला विश्वावर शोककळा

…तर ‘लाडक्या बहिणीं’कडून दंडासहीत रक्कम वसूल करण्यात येईल; भुजबळांचं मोठं विधान