महागाई नियंत्रणासाठी सरकार घेणार मुकेश अंबानींची मदत
केंद्र सरकारने(Government) देशातील वाढत्या महागाईचा निपटारा करण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे मदत मागितली आहे. सरकारकडून सध्या सुरु असलेल्या भारत ब्रँडचे पीठ, तांदूळ आणि डाळी किरकोळ साखळीद्वारे विकण्याचा विचार करत आहे. त्यामुळे आता सरकार देशातील महागाई आवाक्यात आणण्यासाठी उद्योगपतींची मदत घेत असल्याचे पाहायला आहे. परिणामी, सामान्यांना काहीसा का होईना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारमधील(Government) सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स रिटेलशी बोलणी केली आहे. देशात काही राज्यांमध्ये निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी भारत ब्रँडची उत्पादने विकण्यासाठी रिलायन्सच्या JioMart, Amazon आणि BigBasket यासह ई-कॉमर्स कंपन्यांमार्फत व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा सरकार एका खाजगी किरकोळ विक्रेत्यांसोबत त्यांच्या बफर स्टॉकमधून खाद्यपदार्थ सवलतीच्या दरात विकण्यासाठी दीर्घकालीन व्यवस्थेचा विचार करत आहे.
इतकेच नाही सरकार महागाई नियंत्रणासाठी किरकोळ साखळी डीमार्ट आणि इतर किराणा किरकोळ विक्रेत्यांशी देखील चर्चा करत आहे, असे सूत्राने सांगितले आहे. रिलायन्सने टिप्पणी दिली नाही, तर DMart ची मूळ कंपनी Avenue Supermarts ने टिप्पणी मागणाऱ्या ईमेलला त्वरित प्रतिसाद दिला नाही. भारत ब्रँड अंतर्गत, सरकार लोकांना अनुदानित किमतीत अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवते.
जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने 2023 मध्ये भारत आटा, भारत दाल आणि भारत तांदूळ बाजारात आणले होते. ही योजना विशेषतः दारिद्र्यरेषेखाली नसलेल्या लोकांसाठी आहे. त्यामुळे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत अन्नधान्य मिळण्यास पात्र नाही. भारत-ब्रँडेड उत्पादने सध्या नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि नाफेडद्वारे त्यांच्या आऊटलेट्स आणि मोबाईल स्टोअर्ससह मध्यवर्ती स्टोअरद्वारे विकली जात आहे.
दरम्यान, एका मोठ्या किरकोळ विक्रेत्याशी टायअप केल्याने भारत ब्रँड उत्पादनांची देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. रिलायन्स रिटेल, रिलायन्स इंडस्ट्रीजची किरकोळ शाखा, देशात 2,700 पेक्षा जास्त किराणा दुकाने चालवते. कंपनीच्या वेबसाइटनुसार, ही स्टोअर ताजी फळे आणि भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि धान्यांपासून ते मसाले, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि पेये आणि घरगुती आणि वैयक्तिक काळजी उत्पादनांपर्यंत सर्व काही विक्री करतात.
हेही वाचा :
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाची एन्ट्री
तळीरामांनो सावधान! आता ‘मदिरा’ पिऊन गाडी चालवाल तर…
पाच महिने रिचार्ज करण्याची गरज नाही; 400 रुपयांचा हा प्लॅन प्लॅन चालेल 150 दिवस