महायुतीला धक्का! शिंदे गटाच्या मंत्र्याचा पुतण्या गळाला; लवकरच फुंकणार तुतारी
विधानसभा (political)निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि त्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांचा ओढा वाढला आहे. अनेक नेते मंडळींनी तसेच महायुतीतील नेत्यांनी तुतारी हाती घेतली आहे. भाजपला धक्के बसले आहेत. आता शिंदे गटालाही धक्के जाणवू लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधी महायुतीचे टेन्शन वाढले आहे. आताही राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत लवकरच तुतारी फुंकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणुकीआधी(political) राज्यात वेगात घडामोडी घडत आहेत. तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच बारामतीत (Baramati) जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. सूरज देशमुख आणि नानासाहेब देशमुख यांच्या पक्षप्रवेशावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबरोबर त्यांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला होता. त्यामुळे अनिल सावंत लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती.
राजकीय वर्तुळातील या चर्चा खऱ्या आहेत असे संकेत आता मिळू लागले आहेत. अनिल सावंत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी माहिती समोर येत आहे. घटस्थापनेनंत सावंत तुतारी हाती घेतील असे सांगण्यात येत आहे. अनिल सावंत मागील दहा वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात चांगलेच सक्रिय झाले आहेत. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले होते.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर या मतदारसंघातील राजकीय वातावरणात मोठा बदल झाला आहे. आता या मतदासंघात कुणाला तिकीट मिळणार यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. या घडामोडींवर अनिल सावंत यांनीही भाष्य केले. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत. असे असले तरी ज्याला कुणाला तिकीट देताल त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू असे शरद पवारांना सांगितल्याचे अनिल सावंत यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवानंतर मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची बैठक घेणार आहोत तोपर्यंत काम करत राहा अशा सूचना शरद पवार यांनी दिल्याचे सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा:
मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा
वृषभसह आज ‘या’ 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, धनलाभाचे संकेत
काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत