रागीट पार्टनरला ‘या’ टिप्सने हँडल करा; दुसऱ्या दिवशी स्वत: सॉरी म्हणेल

प्रत्येक जोडप्यात काही ना काही कारणावरून वाद आणि भांडणे (hr partner)होत असतात. यातील काही भांडणे ही दोघांच्या कुटुंबीयांच्या विचारांशी आपले विचार जुळत नसल्याने होत असतात. कारण त्यावेळी दोघेही स्वत:चा आणि एकमेकांचा नाही तर कुटुंबीयांचा जास्त विचार करतात. भांडणांमध्ये आपण ज्यावर जिवापाड प्रेम करत आहोत त्याच व्यक्तीचा प्रचंड राग येतो.

रागात असताना रागावर नियंत्रण ठेवणं(hr partner) गरजेचं आहे. मात्र अनेकांना अशा पद्धतीने स्वत:वर आणि स्वत:च्या रागावर संय्यम ठेवता येत नाही. तु्म्ही जर रागीट असाल तर तुमचा पार्टनर संयम्मी आणि खरं प्रेम करणारा असणं गरजेचं आहे. अन्यथा काही नात्यांमध्ये पार्टनरच्या रागाचा गैरफायदा घेऊन त्यावर विविध आरोप लावले जातात आणि पार्टनरला सोडून दिलं जातं. तुम्ही यापैकी नसाल आणि आपल्या पार्टनरवर खरं प्रेम करत असाल तर रागीट जोडीदाराशी कसं वागायचं याची माहिती जाणून घेऊ.

रागावर तुम्ही व्यक्त होऊ नका
अनेकदा राग येण्याच्या समस्या महिलांमध्ये जास्त असतात. महिलांना येणाऱ्या मासिक पाळीमुळे त्याचा मूड अचानक स्विंग होतो आणि त्या रागवतात. यामध्ये त्यांना आपल्या पार्टनरला दोष द्यायचा नसतो किंवा त्याच्या विषयी त्यांच्या मनात काही वाईट भावना देखील नसतात तरी त्या अचानक रागवतात. अशावेळी तु्म्ही रागावर काहीच उत्तर देऊ नका आणि काहीच व्यक्त होऊ नका.

प्रेमाने समजवा
अनेकवेळा घरच्या विविध अडचणी आणि कामाचा ताण या सर्वांमुळे पती आपल्या पत्नीवर गरज नसताना ओरडतो. मात्र यामध्ये त्याच्या मनात आपल्या पत्नी बद्दल द्वेषाची भावना नसते. त्यामुळे अशावेळी पत्नीने आपल्या पतीला समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्या रागाला रागात नाही तर प्रेमात प्रत्युत्तर दिलं पाहिजे.

स्वत:च एखाद्या गोष्टीचा वेगळा अर्थ काढू नका
भांडणामध्ये जेव्हा पती पत्नी दोघेही एकमेकांशी रागात संवाद साधतात तेव्हा ते बऱ्याच न पटणाऱ्या आणि काहीच अर्थ नसलेल्या गोष्टी बोलतात. त्यामुळे तुमच्या पत्नीने किंवा पतीने तुम्हाला रागात काही म्हटले तर स्वत:च त्याचा वेगळा अर्थ काढू नका. पार्टनर असं का म्हटला त्याचा अर्थ त्याला विचारा. या काही सिंपल टिप्सने रागावलेला पार्टनर स्वत: दुसऱ्या दिवशी तुमची माफी मागेल.

हेही वाचा :

भरसभेत देवेंद्र फडणवीस कुणाला I Love You म्हणाले?

अभिनेत्री करिना कपूरवर मोठं संकट; अडकली कायद्याच्या कचाट्यात

तुफान उसळीनंतर सोने-चांदीची विश्रांती; इतका उतरला भाव